Project report in Marathi

कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा (Project Report for Bank Loan in Marathi)

कोणत्याही व्यवसायाचा कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (project report for bank loan) तयार करण्याअगोदर आपण त्या व्यवसायाची इतंभूत माहिती गोळा करावी, सहसा बहुतेक जन त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट वर प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याची सर्वस्वी जबाबदारी सोपवतात. चार्टर्ड अकाउंटंट जरी चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत असले तरी ते आपण दिलेल्या माहितीवरच अहवाल बनवत असतात. आपण जर आपल्या चार्टर्ड अकाउंटंट ला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली नाही तर ते मार्केट ची सर्वसाधारण माहिती भरून रिपोर्ट तयार करतात. हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण जसेच्यातसे बँकेमध्ये सादर करतो आणि मग बँक अधिकाऱ्यांनी प्रोजेक्ट रिपोर्टमधील काही माहिती आपल्याला विचारली तर ती आपल्याला देता येत नाही.

प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापूर्वी जमा करावयाची माहिती (Basic Information required for Project Report)

Table of Contents

आपण आपल्या व्यवसायासाठी मुदत कर्ज करणार असाल तर आधी आपण येणार खर्च अंदाजे तयार करावा आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वस्तूचे कोटेशन किंवा इस्टिमेट तयार करून घ्यावे, सहसा कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी खालील प्रमाणे खर्च येत असतात:

  1. ज्या ठिकाणी आपण व्यवसायासाठी शेड करणार आहेत ती जागा आधी स्वच्छ करून घ्यावी लागेल तसेच त्या जागेचे दगड व मुरूम भरून लेव्हलिंग करून घ्यावे लागेल.
  2. त्यानंतर शेड साठी लागणारे लोखंडी अँगल, पात्र, शेड तयार करण्याची मजुरी इत्यादी खर्च येतो.
  3. शेड करून झाल्यावर फ्लोअरिंग करून ह्यावी लागेल.
  4. आपल्याला वॉशरूम बांधायची असल्यास त्याचाही खर्च गृहीत धरावा लागेल.
  5. व्यवसायासाठी लागणारे विविध फर्निचर जसे कि टेबल, खुर्च्या, रॅक, लाईट फिटिंग्स, इत्यादी.
  6. मशिनरी

वरील येणाऱ्या सर्व खर्चाचे कोटेशन किंवा एस्टीमेट त्या त्या सेवा पुरवठा दाराकडून तयार करून घ्यावे जेणेकरून हा सर्व खर्च आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दाखवता येईल आणि आपला प्रोजेक्ट रिपोर्ट जास्त वास्तववादी वाटेल.

१. प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती (Basic Information about Project)

सर्वात प्रथम आपण आपल्या प्रकल्प बद्दल थोडक्यात माहिती लिहावी जसे कि आपण कोणता प्रकल्प करणार आहेत, त्यामध्ये काय तयार करणार आहेत, त्याचे उपयोग काय, आपला प्रॉडक्ट मार्केट मधील इतर प्रॉडक्ट पेक्षा कसा वेगळा आहे, मार्केट मधील डिमांड कशी आहे इत्यादी जेणेकरून अहवाल वाचताना बँक अधिकाऱ्यास आपल्या प्रकल्पाविषयी ढोबळ कल्पना येईल.

२. आपल्याविषयी थोडक्यात माहिती (Personal Background)

त्यानंतर आपल्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी जसेकी आपले शिक्षण किती झाले आहे, व्यवसायातील आपला अनुभव काय आहे, आपली कौटुंबिक माहिती, आपली या व्यवसायासंबंधी उद्दिष्टे काय आहेत, हि माहिती वाचून वाचणाऱ्याला वाटले पाहिजे तुम्ही किती महत्वाकांक्षी आणि डेडिकेटेड आहेत. project report for bank loan तयार करताना या माहितीचा आवर्जून उल्लेख करावा.

३. लायसन्स किंवा परवाने (License for Starting New Business)

आपल्या व्यवसायासाठी लागणारे विविध परवाने याबद्दल माहिती लिहावी जसे कि उद्यम रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट, फूड लायसन्स, विद्युत पुरवठा, स्थानिक प्रशासनाची ना हरकत प्रमाणपत्र लागत असेल तर, GST लागू असेल तर. हि सर्व माहिती टेबल स्वरूपात लिहून त्या समोर त्याचा परवाना क्रमांक लिहावा व खाली न चुकता आपल्या project report for bank loan मध्ये नमूद करावे कि या सर्व परवान्याच्या प्रति सोबत जोडलेल्या आहेत.

४. प्रकल्पाला येणाऱ्या खर्चाचा तपशील (Cost of Establishment)

यामध्ये आपण जमा केलेल्या कोटेशन बद्दल माहिती लिहावी, हि माहिती लिहिताना व्यवस्थित टेबल करून खर्चाचा तपशील व त्यापुढे येणार खर्च लिहावा. सर्वात खाली आवर्जून लिहावे कि या सर्व खर्चाचे कोटेशन सोबत जोडलेले आहेत जेणेकरून वाचणाऱ्याला detailed project report बद्दल एक विश्वासार्हता वाटेल. आपल्याला जर खेळत्या भांडवलाची किंवा उत्पन्न सुरु होईपर्यंत येणाऱ्या खर्चाची माहिती सुद्धा येथे लिहू शकता. एक लक्षात ठेवा प्रकल्पाला येणारा छोट्यात छोटा गरजेचा खर्च येथे नक्की नमूद करावा जेणेकरून हा सर्व खर्च प्रकल्प खर्च म्हणून विचारात घेता येईल. जर आपण हे सर्व खर्च प्रकल्प खर्चात नमूद केले नाहीत तर आपल्याला व्यवसाय सुरु करताना यासाठी वेगळा खर्च करावा लागेल.

५. कच्च्या मालाची उपलब्धता (Raw Material Availability)

आपल्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आपण कसा उपलब्ध करणार आणि त्याबद्दल कोण्या पुरवठादाराशी करार केला असल्यास त्याची प्रत सोबत नक्की जोडावी. हा कच्च्या मालाची वर्षभर उपलब्धता असते का किंवा त्यासाठी काही पर्यायी व्यवस्था याबद्दल माहिती detailed project report मध्ये लिहावी. जर आपल्याला कच्चा माल साठवावा लागत असेल तर त्याची कशी व्यवस्था केली आहे ते लिहावे.

६. कामगाराची उपलब्धता (लंबोअर )

आपल्या व्यवसायात इतर कामगार लागत असतील तर त्यामध्ये कुशल किती व अकुशल किती हे नमूद करावे, त्यांचे मासिक वेतन किती देणार या बद्दल माहिती लिहावी. स्थानिक पातळीवर कामगार उपलब्ध आहेत का याची नोंद करावी. जर कोणी निवासी कामगार ठेवणार असाल तर त्याच्या राहण्याच्या खोलीच्या बांधकामाचा खर्च आपण एकूण खर्चात जोडू शकता.

७. विक्री व्यवस्था (सेल्स अँड मार्केटिंग )

तयार झालेल्या प्रॉडक्ट ची विक्रीची काय व्यवस्था केली आहे ते लिहावे जसे आपण स्वतः विकणार असाल, डिस्ट्रिब्युटर किंवा विक्री प्रतिनिधींची नियुक्ती करणार असला, तसेच मालाच्या वाहतुकीची कशी व्यवस्था केली आहे. आपण विक्रीसाठी काही विशेष व्यवस्था केली असेल जसे कोणासोबत करार केला असेल तर त्याची प्रत जोडावी. एक लक्षात ठेवा प्रॉडक्ट तयार करून दुकानात बसून कोणीही आपला प्रॉडक्ट विकत घेणार नाही, ग्राहक आपल्या पर्यंत येण्याची वाट पाहू नको तर आपण ग्राहक पर्यंत पोहोचण्याची व्यवस्था निर्माण करा.

८. फायनान्शिअल प्रोजेक्शन (Financial Projection)

या मध्ये आपल्याला आपल्या प्रकल्पात येणाऱ्या खर्चापासून ते नफ्यापर्यंत सर्व आकडेवारी detailed project report मध्ये मांडावी लागेल, यामध्ये खालीलप्रमाणे विविध घटक समाविष्ट असतात:

अ. वार्षिक विक्री (Annual Sales)

ब. प्रॉडक्ट तयार करण्यासाठी येणार एकूण खर्च (Cost of Goods or Cost of Production)

  1. कच्चा माल खरेदी खर्च
  2. कामगार खर्च
  3. प्रवास खर्च
  4. इंधन व टेलिफोन खर्च
  5. जाहिरात खर्च
  6. इतर प्रशासकीय खर्च
  7. शासकीय कर
  8. कर्जाचे हप्ते
  9. कॅश क्रेडिट असेल तर त्याचे व्याज

वरील येणारा सर्व खर्च विक्रीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून वजा केल्यास आपल्याला आपल्या व्यवसायातून होणार निव्वळ नफा काढता येईल.

वर दिलेली माहिती आपल्याला रु. २ लाख रुपये च्या कर्जासाठी पुरेशी आहे, रु. २ लाख पर्यंतच्या कर्जासाठी आपण वरील प्रमाणे आपल्या व्यवसायाची माहिती तयार करू शकता जी कुठल्याही बँकेमध्ये ग्राह्य धरली जाईल आणि जर आपल्याला रु. २ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा project report for bank loan तयार करावयाचा असेल तर वरील माहितीसोबतच खालील विविध फायनान्सियल स्टेटमेंट तयार करावे लागतील. आपण हे स्टेटमेंट आपल्या चार्टर्ड अकाउंट किंवा कर सल्लागार यांच्याकडून बनवून घेऊ शकता किंवा स्वतः बनवू शकता.

प्रोजेक्ट रिपोर्टसाठी लागणारे फायनान्सियल स्टेटमेंट

  1. Profitability Statement
  2. Projected Balance Sheet
  3. Cash Flow Statement
  4. Fund Flow Statement
  5. Ratio Analysis
प्रोजेक्ट रिपोर्ट

Profitability Statement (प्रोजेक्ट रिपोर्ट व त्यातील नफ्याचे गणित)

Profitability Statement मध्ये सर्वात प्रथम आपल्या व्यवसायामध्ये होणारी एकूण वार्षिक विक्री दाखवली जाते तसेच यात आपले प्रॉडक्ट तयार करण्यासाठी येणार खर्च दाखवला जातो. यामध्ये फर्निचर किंवा मशिनरी मध्ये होणारी आर्थिक घट दाखवली जाते. तसेच यामध्ये एकूण नफा, कर व निव्वळ नफा याची माहिती असते.

Projected Balance Sheet

यामध्ये आपण केलेली गुंतवणूक, आपण घेणार असलेल्या कर्जाची रक्कम, उधारी येणे किंवा उधारीवर घेतलेल्या मालाची रक्कम, आयकर तसेच हा गुंतवलेला आणि कर्जाची रक्कम कुठे गुंतवली याची माहिती, कॅश इन हॅन्ड, बँक बॅलन्स, शिल्लक माल.

Cash Flow Statement (कॅश फ्लो स्टेटमेंट)

Fund Flow Statement (प्रोजेक्ट रिपोर्टमधील महत्वाचा भाग)

आपल्या व्यवसायामध्ये येणार पैसा कसा येतो आणि खर्च होताना कसा होतो हे या फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये दिलेले असते.

Ratio Analysis (मुदत कर्जाच्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी)

डेअरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (५ गाय/म्हैस)

डेअरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (१० गाय/म्हैस)

बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ९.७५ लाखाच्या कर्जासाठी)

बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ५.०० लाखाच्या कर्जासाठी

पापड उद्योगासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ५.८० लाखाच्या कर्जासाठी)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *