कर्ज (Loans)व्यवसाय (Business)

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME Scheme). भारतामध्ये लाखोंच्या संख्येने असंघटित क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आहेत जे आपला व्यवसाय स्थानिक पातळीवर व कुठल्याही ब्रँडनेम शिवाय करत आहेत. याच अन्न प्रक्रिया उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते खासकरून ग्रामीण भागात व महिलांसाठी रोजगार निर्मिती. परंतु या इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या क्षेत्राला अजून पर्यंत योग्य त्या प्रमाणात कर्ज पुरवठा झालेला नाही.

या उद्योगाला आजकालच्या वेगवान युगात मोठ्या प्रमाणात विविध संकटांचा सामना करावा लागत आहे जसे कि, १. योग्य प्रमाणात प्रशिक्षण नसणे. २. नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर नसणे. ३. त्यामुळे उत्पादकता कमी होते, ४. आकर्षक पॅकेजिंग ब्रॅण्डिंग नसल्याने बाजारात कमी उठाव, ५. गुणवत्तेचे कुठलेली स्टॅंडर्ड मोजमाप नाही. ६. मार्केटिंग कौशल्य नसणे. ७. गुंतवणुकीसाठी भांडवलाची कमतरता तसेच बँकांकडून किमान कर्ज पुरवठा. या आणि अशा कितीतरी अडी अडचणीमुळे अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकास होऊ शकला नाही.याच अडचणींवर मात करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME) सुरु केलेली आहे. आपण यालेखात याबद्दल अगदी सविस्तरपणे या योजनेची माहिती घेऊया (PMFME scheme in Marathi).

PMFME Scheme ची उद्दिष्ट्ये

Table of Contents

  1. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना, या उद्योगांमधील वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), बचत गट (Self Help Groups), सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा करणे.
  2. अशा उद्योगांमध्ये पुरवठा साखळी मजबूत करणे.
  3. असंघटित अन्न प्रक्रिया उद्योग नोंदणीकृत करणे.
  4. सार्वजनिक किंवा सामाईक अन्न प्रक्रिया सुविधा निर्माण करणे.
  5. साठवण क्षमता वाढवणे, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा उभारणे, पॅकेजिंग सुविधा उभारणे.
  6. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण.

PMFME Scheme साठी पात्रता (PMFME scheme eligibility)

PMFME scheme eligibility
  1. वैयक्तिक लाभार्थी
  2. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक
  3. शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO)
  4. बचत गट (Self Help Groups)
  5. सहकारी संस्था
  6. नवीन अन्न प्रक्रिया सुरु करू इच्छिणारे लाभार्थी.
  7. प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म
  8. लाभार्थीचे कमीत कमी वय १८वर्ष असावे
  9. सुरवातीला लाभार्थी किमान आठवी पास असावा असा नियम होता परंतु आता शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु लाभार्थ्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असावा.
  10. एका कुटुंबातील एक व्यक्ती पात्र

योजनेअंतर्गत पात्र प्रकल्प (Eligible Projects under PMFME Scheme)

  1. नवीन सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
  2. सध्या चालू असणारे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
  3. प्रकल्पात १० पेक्षा कमी कामगार असावेत
  4. प्रकल्पाची मालकी वैयक्तिक, प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म असावी.
  5. सुरवातीला LLP व Pvt Ltd कंपन्या या योजनेत पात्र नव्हत्या परंतु २०२२ पासून यासुद्धा पात्र आहेत.
  6. बिगर सरकारी संस्था (NGO)

कर्ज रक्कम Loan Amount

या योजनेअंतर्गत ९०% पर्यंत कर्ज मिळू शकते. परंतु PMFME scheme subsidy अंतर्गत मिळणारे अनुदान प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत मिळते म्हणजेच आपण जर ३० लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प उभारणार असाल तर आपल्याला ३५% व जास्तीत जास्त १० लाख अनुदान मिळू शकते.

स्वगुंतवणूक / मार्जिन मनी (Margin Money)

PMFME scheme अंतर्गत कर्जासाठी आपल्याला कमीत कमी १०% स्वगुंतवणुक करणे बंधनकारक आहे.

व्याजदर Rate of Interest

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी बँकेमध्ये सरासरी ११% ते ११.५०% व्याजदर आहे. आपण जर आपल्या बँकेला विनंती केली कि आपले कर्ज “कृषी पायाभूत सुविधा उभारणी योजना (PMFME scheme with Agriculture Infrastructure Fund)” या योजनेला लिंक केले आणि आपले कर्ज या योजनेअंतर्गत पात्र झाले तर या योजनेअंतर्गत ९% व्याजदर लागू होतो. त्याउपर ३% व्याज परतावा मिळतो म्हणजेच आपल्याला हे कर्ज ६% व्याजदराने पडेल.

PMFME Scheme Subsidy अनुदान संरचना

या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत अनुदान मिळते. अनुदानासाठी अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. PMFME Scheme Subsidy हि क्रेडिट लिंक सबसिडी (Credit Linked Subsidy)आहे म्हणजेच आपली सबसिडी आपल्या कर्ज असलेल्या बँकेला पाठवली जाते व ती सबसिडी आपल्या कर्जाला लिंक केली जाते व ३ वर्षानंतरच आपल्या कर्ज खात्याला जमा होते.

कर्जाला तारण Security for PMFME Scheme loan

  1. प्रकल्पाचे शेड, मशीन, कच्चा माल इ.
  2. १० लाखांपर्यंत कोलॅटरल सेक्युरिटीची आवश्यकता नसते, १० लाखांपर्यंतची कर्जे मुद्रा योजनेअंतर्गत वर्गीकृत करून मुद्रा ग्यारंटी फंड अंतर्गत सुरक्षित केली जातात.
  3. १० लाखवरच्या कर्जाला मालमत्ता तारण देऊ शकता किंवा CGTMSE तारण योजनेअंतर्गत कव्हर करू शकता.
  4. कर्जाला तारण घेण्याच्या संबंधित सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित बँकेला असतो.

परतफेड कालावधी Repayment Tenure

PMFME Scheme अंतर्गत जास्तीत जास्त १० वर्ष परतफेड कालावधी मिळतो परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे परतफेड कालावधी हा प्रकल्पातून होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो त्यामुळे छोट्या प्रकल्पासाठी कदाचित बँक कमी परतडफेड कालावधी सुद्धा देऊ शकते.

PMFME Scheme साठी पात्र उद्योग (pmfme scheme list)

या योजनेअंतर्गत सर्व छोटे अन्न प्रक्रिया उद्योग पात्र आहेत, त्याची प्रतीकात्मक यादी खालील प्रमाणे आपण या पेक्षा वेगळा अन्न प्रक्रिया उद्योग सुद्धा करू शकता :

  1. बेकरी उद्योग
  2. पापड तयार करणे
  3. मसाले तयार करणे
  4. काजू प्रक्रिया उद्योग
  5. दाल मिल
  6. बटाटे व केली चिप्स
  7. मिल्क प्रॉडक्ट
  8. कच्ची घाणीचे तेल
  9. शेवया तयार करणे
  10. लोणचे तयार करणे
  11. टोमॅटो केचप तयार करणे

बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ९.७५ लाखाच्या कर्जासाठी)

योजनेअंतर्गत पात्र नसलेले प्रकल्प (Negative List of Projects under PMFME Scheme)

  1. प्रक्रिया न केलेल्या धान्य व मसालेयांची खरेदी विक्री
  2. कच्च्या दुधाची खरेदी विक्री
  3. प्रक्रिया न केलेले फळ व भाज्या
  4. मधुमक्षिका पालन
  5. कोणताही प्रक्रिया न केलेला कृषी माल
  6. कुक्कुटपालन , वराहपालन, शेळीपालन.
  7. मांस व मासे विक्री
  8. हॉटेल, मेस, किराणा इ.

बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ५.०० लाखाच्या कर्जासाठी)

एक जिल्हा एक उत्पादन One District One Product (ODOP)

ODOP हा PMFME Scheme मधील महत्वाचा घटक आहे, या ODOP योजनेअंतर्गत एका जिल्ह्यात एखादा विशिष्ट प्रॉडक्ट असेल तर त्या संबंधित अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी चालना दिली जाते जेणेकरून त्या प्रॉडक्टच्या पुरवठा साखळीत किंवा मार्केटिंग साठी विशेष लक्ष घालून त्या उद्योगाचा विकास करता येईल. या अंतर्गत काही सामायिक मूलभूत सुविधा उभारल्या जातात उदा. कोल्ड स्टोरेज, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा, पॅक हाऊस.

आपल्या जिल्ह्यासाठी ODOP प्रॉडक्ट पोर्टलवर खालील ठिकाणी पाहता येईल:

One District One Product (ODOP)

PMFME Scheme साठी निवड प्रक्रिया (Selection Process for Individual Micro Units)

  1. ODOP अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पाला प्राधान्य असेल.
  2. जिल्हा पातळीवर योजनेसाठी अर्ज मागवले जातील.
  3. रिसोर्स पर्सन (या लेखात पुढे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे) आपल्या प्रकल्पाचा सर्वे करेल.
  4. सर्वे झाल्यावर रिसोर्स पर्सन “जिल्हा पातळीवरील समितीकडे” रिपोर्ट जमा करतात.
  5. जिल्हा समितीने मंजुरी दिल्यावर कर्जासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा.
  6. बँकेकडे प्रस्ताव सादर करताना रिसोर्स पर्सन आपल्या मदतीला नेहमी उपलब्ध असतो.
  7. बँकेमध्ये कर्ज मंजूर झाल्यावर बँक ऑनलाईन पद्धतीने माहिती अपलोड करते.
  8. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँक कर्ज वितरण करते व PMFME scheme च्या पोर्टल वर माहिती अपलोड करते.
  9. काही दिवसात आपल्या अनुदानाचा पहिला टप्पा बँकेकडे जमा होतो. त्यानंतर काही दिवसांनी दुसरा टप्पा.
  10. अनुदान बँकेत जमा झाल्यावर बँक ते अनुदान आपल्या कर्ज खात्याला लिंक केली जाते.

डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन District Resource Person

डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन हि अशी व्यक्ती असते जी आपल्याला PMFME Scheme ची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करत असते. हि व्यक्ती PMFME ने नेमलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नसते. आपल्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सनची माहिती पोर्टलवर खाली दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे दिलेली आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी Farmer Producer Organizations (FPOs)

शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे समान प्रकारचे शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार केलेली सहकारी संस्था. यासाठी ३५% पर्यंत अनुदान मिळते. हि सबसिडी क्रिडीट लिंक सबसिडी असते म्हणजेच कर्जाला बॅक एंडेड लिंक केली जाते. त्यासोबतच PMFME कडून प्रशिक्षण सुद्धा मिळते. या योजनेअंतर्गत FPO’s फक्त ODOP प्रकल्पासाठी पात्र असतील. त्यासोबतच FPO’s चे टर्नओव्हर कमीत कमी १ कोटी असावे. तसेच प्रकल्प खर्च सध्याच्या टर्नओव्हर पेक्षा जास्त असू नये.

PMFME योजनेची ऑनलाईन एप्लिकेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप (Process Flow of PMFME Scheme Online Application: Step By Step)

Process Flow of PMFME Scheme Online Application Step By Step
  1. स्टेप १ – ऑनलाईन रजिस्ट्रेशन: लाभार्थी  PMFME Scheme च्या या पुढील वेबसाईटवरून योजनेसाठी अर्ज करू शकतो. (Click here for PMFME Portal)
  2. स्टेप २- प्राथमिक सर्वे : ऑनलाईन पद्धतीने आलेल्या सर्व अर्जाची छाननी जिल्हा समिती करते. पात्र अर्ज बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी पाठवले जातात. बचत गट व FPO चे अर्ज राज्यस्तरीय समितीकडून बँकांकडे पाठवले जातात. अर्जात काही त्रुटी असतील तर त्या आपल्याला कळवल्या जातील व त्या त्रुटींची पूर्तता ३० दिवसांच्या आत करणे गरजेचे आहे.
  3. स्टेप ३ – बँक PMFME च्या पोर्टलवर लॉगिन करून आपले अर्ज डाउनलोड करू शकतात. बँक त्यांच्या नियमानुसार अर्जाची पडताळणी करतात काही त्रुटी असतील तर आपल्याला सांगतात. जर सर्व आपला अर्ज पात्र असेल तर बँक आपले कर्ज मंजूर करते. बँकेला आपला अर्ज योग्य कारण देऊन नाकारण्याचा अधिकार आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँक आपले कर्ज वितरण करते.
  4. स्टेप ४ – त्यानंतर आपले अनुदान आपल्या बँकेकडे पाठवले जाते. हि सबसिडी आपल्या कर्ज खात्याला अशा प्रकारे लिंक केली जाते जेणेकरून तेवढ्या रकमेला व्याज आकारले जाणार नाही.
  5. स्टेप ५ – तीन वर्ष पर्यंत बँक आपल्या कर्ज खात्याचा तपशील अपडेट करत राहतील, तीन वर्षाच्या आधी आपल्याला कर्ज खाते बंद करता येत नसते. या सबसिडीचा लॉक इन कालावधी ३ वर्षाचा असतो.

प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल का?

PMFME Scheme साठी आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागेल त्यासाठी आपण चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स कंसल्टंट ची मदत घ्यावी लागेल. जर आपल्या कर्जाची रक्कम कमी असेल तर आपण पुढील लिंक वरून प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करू शकता तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करतात यावरील पुढील लेख वाचावा. “कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा”

आपण जर मोठ्या रकमेसाठी कर्ज करणार असाल तर आपण तयार करून घेत असलेल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये खालील माहिती असणे गरजेचे आहे कारण हि माहिती आपल्याला या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना लागते.

  1. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट
  2. बॅलन्सशीट
  3. कॅश फ्लो स्टेटमेंट
  4. फायनान्सियल रेशो
  5. कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट
  6. डिप्रीसिएशन स्टेटमेंट

ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारी कागदपत्रे व माहिती

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. व्यवसायाचा पत्त्याचा पुरावा
  4. भाडेकरार (असल्यास)
  5. उद्यम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  6. शॉप ऍक्ट
  7. FSSAI प्रमाणपत्र
  8. GST (असल्यास)
  9. खरेदी करणार असलेल्या मशीनचे कोटेशन
  10. शेड बांधणार असल्यास त्याचे कोटेशन
  11. विद्युत कनेक्शन
  12. प्रोजेक्ट रिपोर्ट
  13. बँक पासबुक
  14. आपल्या व्यवसायाबाद्दल संपूर्ण माहिती
  15. ITR (असल्यास)

कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी PMFME योजना (Agri Infrastructure Fund Scheme linking with PMFME Scheme)

PMFME योजनेअंतर्गत केलेले कर्जासाठी AIF Scheme चा सुध्दा लाभ घेता येतो. आपले कर्ज या योजनेअंतर्गत सुध्दा पात्र होण्यासाठी आपण आपल्या बॅंकेकडे अर्ज करू शकता. या योजनेत काही ठराविक प्रकल्प पात्र होतात (AIF Scheme अंतर्गत पात्र प्रकल्प यादी). आपला प्रकल्प जर या योजनेत पात्र झाला तर या कर्जासाठी बॅंक आपल्याला ९% व्याजदर आकारते व यातील ३% व्याज AIF Scheme अंतर्गत परतावा मिळते म्हणजेच आपल्याला हे कर्ज फक्त ६% व्याजदराने चालू राहील.

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी AIF Scheme च्या पोर्टलवर PMFME योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास सोय केलेली आहे जेणेकरून हे लाभार्थी आपली माहिती थेट AIF पोर्टल वर भरू शकतील. यासाठी खालील माहिती आपल्याला लागेल

  1. PMFME Scheme वेबसाईट वरील एप्लिकेशन आयडी
  2. मंजुरी पत्र
  3. प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया खर्चासाहित

AIF Scheme च्या अधिक माहितीसाठी योजनेच्या पुढील वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. (AIF-Scheme Website)

नेहमी विचारले जाणारे प्रश्न Frequently Asked Questions (FAQ)

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

3 thoughts on “PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना

  • Pawar Rushikesh Ramesh

    Packed drinking water हा व्यावसाय या स्किम मध्ये बसु शकतो का

    Reply
    • पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्लांट हा फूड प्रोसससिंग या प्रकारात येत नसल्याने हा व्यवसाय PMFME योजनेअंतर्गत पात्र होऊ शकत नाही.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *