35% अनुदान, 50 लाख कर्ज PMEGP Loan information in Marathi
PMEGP loan Scheme म्हणजेच पंतप्रधान ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister’s Employment Generation Programme) हि योजना एप्रिल २००८ साली सुरु झाली. pmegp scheme अंतर्गत कर्ज योजना सुक्ष्म, लहान व मध्यम उद्योग मंत्रालय आणि खादी व ग्रामोद्योग महामंडळ यांच्या मार्फत राबविली जाते.
योजनेचे उद्दिष्ट
Table of Contents
ग्रामीण व शहरी भागात विविध उद्योगांची उभारणी करून रोजगार निर्मिती करणे तसेच ग्रामीण कारागीर व युवकांना व्यवसायाची संधी निर्माण करून त्यांना रोजगाराचे कायम साधन उत्पन्न उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागात तिथल्या तिथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल. सरकारचा उद्देश आहे कि प्रत्येक प्रकल्पातून साधारण ३ ते ५ व्यक्तींना रोजगार मिळावा.
पात्रता (PMEGP loan eligibility)
- १८ वर्ष पूर्ण असणारे भारताचे नागरिक ज्यांनी याआधी शासकीय अनुदानाचा लाभ घेतला नसेल ते या योजनेसाठी पात्र आहेत.
- बचत गट सुद्धा PMEGP loan साठी पात्र आहेत.
- या योजनेअंतर्गत उत्पन्नाची कोणतीही अट नाही, सर्व उत्पन्न गटातील उमेदवार यासाठी पात्र आहेत.
- आपल्याला जर एखादा १० लाखापेक्षा अधिकचा उत्पादन प्रकल्प किंवा ५ लाखापेक्षा जास्तीचा सेवा प्रकल्प सुरु करायचा असेल तर आपले शिक्षण कमीत कमी आठवी पास असले पाहिजे.
- १० लाखापेक्षा कमी रकमेचा उत्पादन प्रकल्प व ५ लाखापेक्षा कमी रकमेचा सेवा प्रकल्प सुरु करायचा असेल तर शिक्षणाची कोणतीही अट नाही.
- हि योजना मुख्यत्वे रोजगार निर्मितीला लक्ष ठेऊन सुरु केली आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत नवीन प्रोजेक्ट पात्र आहेत.
- सहकारी संस्था कायद्याअंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था सुद्धा PMEGP Loan साठी पात्र आहेत.
प्रोजेक्ट कॉस्ट (Project Cost)
प्रकल्पाचा प्रकार | प्रकल्प खर्च (जास्तीत जास्त) |
उत्पादन क्षेत्र | रु. ५० लाख |
सेवा क्षेत्र | रु. २० लाख |
कर्ज रक्कम (Loan Amount)
संवर्ग | कर्ज |
सामान्य प्रवर्ग | ९०% |
विशेष प्रवर्ग (SC/ST/OBC/Minorities/Women/PH) | ९५% |
कर्जाचे स्वरूप (Loan Type)
PMEGP Loan हे जास्तीत जास्त ५० लाख रुपयापर्यंत मिळू शकते यामध्ये मुदत कर्ज (TERM LOAN) वर खेळते भांडवल (WORKING CAPITAL) या दोन्हीचा समावेश आहे, परंतु एकूण कर्जामध्ये खेळते भांडवल जास्तीत जास्त ४०% पेक्षा जास्त असू नये.
मार्जिन मनी / स्व:गुंतवणुक (Margin)
संवर्ग | कर्ज |
सामान्य प्रवर्ग | १०% |
विशेष प्रवर्ग (SC/ST/OBC/Minorities/Women/PH) | ५% |
व्याज दर (PMEGP loan interest rate)
PMEGP कर्ज योजनेअंतर्गत ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले आहे त्या प्रमाणे बँक आपल्या या कर्जाला व्याज लावत असतात. उदा. बँका व्याजदर लावताना विविध गटवारी करतात जसे की MSME लोन, शेतीशी निगडित कर्ज, अन्न प्रक्रिया कर्ज अशा विविध प्रकारात वेगवेगळे व्याज दर लागत असतात. सरासरी बँकांचे व्याजदर ९ ते ११ टक्क्यांच्या आसपास आहेत.
कर्जाला तारण (Security for PMEGP Loan)
- कर्जरकमेमधून खरेदी केली सर्व मशिनरी किंवा अससेट्स बँकेकडे तारण असतात.
- १० लाखांपर्यंतच्या कर्जांना कोणतेही तारण देण्याची आवश्यकता नसते कारण १० लाखांपर्यंतची CGTMSE गॅरंटी अंतर्गत कव्हर होतात.
- त्यासोबतच त्या त्या प्रकल्पाच्या प्रकारानुसार १० लाखाच्या वरील कर्जालासुद्धा CGTMSE गॅरंटी घेता येते किंवा आपण त्यासाठी इतर मालमत्ता तारण देऊ शकता.
- CGTMSE योजनेबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचू शकता.
PMEGP कर्जासाठी लागणारी कागदपत्रे (pmegp loan documents)
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वीज बिल
- भाडे करार
- जागेची कागदपत्रे (जागा स्वतःची असल्यास)
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- खरेदी करणार असलेल्या वस्तूंची किंवा मशीनची कोटेशन
- व्यवसाय परवाना उदा. उद्योग रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट, FSSAI, इतर परवाने
- PMEGP पोर्टलवर केलेल्या अर्जाची प्रत
- स्व:गुंतवणूक उपलब्ध असलेचा पुरावा
- प्रकल्पानुसार इतर कागदपत्रे
बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ९.७५ लाखाच्या कर्जासाठी)
परतफेड कालावधी (Repayment Period)
pmegp loan scheme अंतर्गत ३६ महिने ते ८४ महिन्यांपर्यंत परतफेड कालावधी मिळत असतो, परतफेड कालावधी हा वेगवेगळ्या प्रकल्पावर अवलंबून असतो.
अनुदान PMEGP Subsidy
संवर्ग | ग्रामीण | शहरी |
सामान्य प्रवर्ग | २५ | १५ |
विशेष प्रवर्ग (SC/ST/OBC/Minorities/Women/PH) | ३५ | २५ |
वरील अनुदान कर्ज देणारी बँक ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या लॉगिन मधून कर्ज वितरित केल्याच्या १५ दिवसाच्या आत क्लेम करत असते आणि हि रक्कम पुढील १५ दिवसात कर्ज देणाऱ्या बँकेकडे जमा होत असते. कर्ज वितरित झाल्यानंतर आपण याचा कायम पाठपुरावा घेतला पाहिजे कारण या मध्ये यामध्ये काही त्रुटी असल्यास बँक आपल्याला कळवते त्यामुळे ती त्रुटी आपण लवकरात लवकर पूर्ण करावी.
हे अनुदान बॅक एंडेड (BACK ENDED) स्वरूपाचे असते म्हणजे हे अनुदान आपल्या कर्जाला परतफेडीच्या शेवटच्या रकमेला जोडले जाते त्यामुळे आपल्याला कर्जामध्ये अनुदानाएवढी रक्कम शिल्लक असे पर्यंत परतफेड करावयाची असते व त्यापुढे अनुदानाची रक्कम वापरून कर्ज बंद केले जाते.
अनुदान हे ३ वर्षासाठी लॉक असते व आपल्याला ३ वर्षापर्यंत आपले कर्ज सुरु ठेवणे बंधनकारक असते.
जेवढे अनुदान जमा झालेले आहे त्या रकमेला बँक व्याज आकारात नसते, तरीही आपण आपले कर्ज खाते नियमित तपासून पाहावे व आपल्याला किती व्याज लागत आहे याची कायम नोंद ठेवावी.
समजा ३ वर्षाच्या आत आपले कर्ज थकीत (NPA) झाले तर बँक आपले अनुदान कर्जाला जामोद घेते व पुढील वसुलीसाठी आपल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करते.
बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ५.०० लाखाच्या कर्जासाठी)
योजना राबविणारे विभाग (Sponsoring Agency)
हि योजना खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राबविली जाते तसेच जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत राबविली जाते, आपण या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता त्यानंतर आपल्याला मुलाखतीसाठी बोलावून योग्य उमेदवार निश्चित केले जातात.
उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण pmegp EDP training (Entrepreneurship Development Programme)
१० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी ५ दिवसाचे प्रशिक्षण आणि १० लाखापेक्षा जास्त प्रकल्पासाठी १० दिवसाचे प्रशिक्षण असते. हे प्रशिक्षण प्रत्येक उमेदवारासाठी अनिवार्य असते.
PMEGP Loan योजनेमधील काही महत्वाचे मुद्दे (Points to remember)
- एका कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र आहे.
- कुटुंब म्हणजे स्वतः व पत्नी परंतु भाऊ वेगळे राहत असतील तर ते वेगवेगळे अर्ज करू शकतात.
- हे अनुदान फक्त एकदाच मिळत असते.
- प्रकल्पाच्या दर्शस्थानी योजनेच्या माहितीचा व बँकेचा बोर्ड लावणे बंधनकारक आहे.
- बँक आणि KVIC स्वतः किंवा इतर संस्थांमार्फत आपल्या प्रकल्पाचे केव्हाही पडताळणी करू शकते.
- या कर्जाचे टेकओव्हर करता येणार नाही.
pmegp उद्योग लिस्ट pdf
निषिद्ध प्रकल्पांची यादी (Negative List)
PMEGP योजनेअंतर्गत खालील प्रकल्प करता येणार नाहीत.
- मांस प्रक्रिया
- बिडी, पान, सिगारेट संबंधित उद्योग
- शेतीमधील पीक उत्पादन
- कॅरीबॅग उत्पादन
- पश्मिना लोकरीचा उद्योग
- पर्यावरणाला हानी पोचवणारे इतर उद्योग
- सामाजिक दृष्ट्या निषिद्ध उद्योग
- कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणारे उद्योग
ग्रामीण भागातील बहुतेक जणांचा अर्ज राखीव ठेवला जातो किंवा नाकारला जातो कारण त्यांच्याकडे लोकसंख्या दाखल नसतो परंतु नवीन नियमानुसार आपला भाग जर ग्रामीण भाग असेल तर आपल्याला लोकसंख्येची अट नाही. या संदर्भातील शासकीय नोटिफिकेशन साठी येथे क्लिक करा. MODIFIED PMEGP GUIDELINES 2022
नवीन नियमानुसार या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील, कुठल्याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत जर कोणी व्यक्ती आपल्याला ऑफलाइन पद्धतीने कर्ज मंजूर करण्याचे आमिष दहावीत असेल तर आपण त्यास बळी पडू नये. खाली दिलेल्या लिंक वरून आपण ऑनलाइन अर्ज भरू शकता.
या लेखामध्ये वर सांगितल्या प्रमाणे आपल्याला खालील प्रमाणे बोर्ड आपल्या प्रकल्पाच्या दर्शस्थानी लावावा लागेल.
बहुतेक वेळा अर्जदारांचा असा समज असतो कि बँक अशा शासकीय योजनांची कर्ज प्रकाराने करत नाहीत, परंतु हे साफ खोटे आहे कारण आपला प्रकल्प खरेच चांगला असेल आणि आपली मेहनत करायची तयारी असेल तर बँक स्वतः हि कर्जे करण्यास तयार होतात फक्त आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि कर्जमागणी करायला जाताना आपण प्रकल्पाची सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रकल्पाविषयी कोणत्याही प्रश्नाची उत्तरे सहज देता येतील.
मी या लेखात PMEGP Loan विषयी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी काही माहिती अनावधानाने राहिली असेल किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.
पापड उद्योगासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ५.८० लाखाच्या कर्जासाठी)
- Product on saleProject Report for Aluminum Windows ManufacturingOriginal price was: ₹3,000.00.₹99.00Current price is: ₹99.00.
- Product on saleDetailed Project Report on Biscuit ManufacturingOriginal price was: ₹3,000.00.₹99.00Current price is: ₹99.00.
- Product on saleBiscuit Factory Project Report for Purchase of Machinery and Raw MaterialOriginal price was: ₹3,000.00.₹99.00Current price is: ₹99.00.
- Product on saleProject Report for Biscuit Manufacturing – Machinery onlyOriginal price was: ₹3,000.00.₹99.00Current price is: ₹99.00.
- Product on salePapad Manufacturing Project ReportOriginal price was: ₹3,000.00.₹99.00Current price is: ₹99.00.
- Product on saleBakery Project Report – Cake, Sweets, Namkin, Khari, Toast MakingOriginal price was: ₹3,000.00.₹99.00Current price is: ₹99.00.
- Product on saleBakery Product Project Report for Bank LoanOriginal price was: ₹3,000.00.₹99.00Current price is: ₹99.00.
Pingback: दुग्ध व्यवसाय । डेअरी लोन कसे मिळवावे संपूर्ण माहिती Dairy Farming Loan
mi 2017 la lon purn porshes keli adyap lon dile nahi mala 25 lak
आपण पुन्हा एकदा कर्जासाठी बँकेत मागणी करू शकता, बँकेत कर्ज मंजूर करण्याआधी CMEGP किंवा PMEGP चा फॉर्म ऑनलाईन भरू शकता. आपण कर्ज मागणी करण्यासाठी बँकेत जाण्याच्या अगोदर आपण करणार असलेल्या प्रोजेक्ट ची इतंभूत माहिती घ्यावी जेणेकरून बँक अधिकाऱ्यांनी आपल्याला आपल्या प्रकल्पाविषयी कुठलीही माहिती विचारलेस आपल्याला उत्तम प्रकारे सांगता यावी.
मला सुद्धा स्वतःचा दुध व्यवसाय सुरू करायचा आहे माझा दुग्ध व्यवसाय सुरू आहे पण माझ्याकडे स्वतःचा गोठा नाहीये गाईचा तर मला गाईचा स्वतःचा गोठा तयार करायचा आहे त्यासाठी मला 25 लाखाच्या लोन ची आवश्यकता आहे आम्ही स्वतः भाड्याच्या जागेवर गाईचा गोठा करायचा प्लॅन करत आहोत आम्हाला थोडं मार्गदर्शन करावे ही विनंती
आपल्याला २५ लाखांच्या दुग्धव्यवसाय प्रकल्पासाठी कर्ज हवे असल्यास आपल्याला तारण म्हणून बँकेला शेतजमीन किंवा घर द्यावे लागते. विनातारण फक्त रु. १ लाख ६० हजार कर्ज मिळू शकते. दुग्ध व्यवसाय हा मुद्रा लोन अंतर्गत येत नाही त्यामुळे यासाठी तारण मालमत्ता गरजेचे आहे.
Yes
This scheme is suitable for the running or current business. If our business already setup so we can apply for this scheme.
PMEGP scheme is for only new business or project, if you have existing business then you can apply in CMEGP scheme.
आपल्याला जर नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर फक्त PMEGP योजनेअंतर्गत अर्ज करता येतो. आपला व्यवसाय सध्या सुरू असेल आणि त्याच्यासाठी कर्ज हवे असेल तर आपण CMEGP या योजनेमध्ये अर्ज करू शकता या योजनेअंतर्गत नवीन प्रकल्प असावा अशी कुठलीही अट नाही, जुन्या प्रकल्पासाठी सुद्धा नवीनीकरण किंवा ॲडिशनल युनिट साठी अनुदान उपलब्ध आहे.
This scheme suitable for purchase tempo for fish related business
Purchase of Commercial Vehicle is not eligible under PMEGP as only Manufacturing and Service business are eligible under this, but you can apply under CMEGP scheme if you are resident of Maharashtra.
Can we avail PMEGP finance for medical store.
PMEGP scheme is for Manufacturing business and medical store is trading business. Loans related to medical store not eligible for PMEGP scheme.
300000/-Business loan requirements.
If you want to start new business then you can get the benefit of this scheme. Contact your bank with your loan requirement.