कर्ज (Loans)व्यवसाय (Business)

CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi

CMEGP scheme बद्दल थोडक्यात (What is CMEGP scheme?)

Table of Contents

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) ही योजना सुरु करण्याचा शासनाचा मूळ उद्देश म्हणजे छोटे व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे खासकरून ग्रामीण भागात तसेच काही प्रमाणात शहरी भागात सुद्धा. CMEGP Scheme ची अंमलबजावणी शासनाच्या जिल्हा पातळीवरील दोन संस्थांमार्फत केली जाते त्यातील एक आहे “जिल्हा उद्योग केंद्र”(District Industries Center) व दुसरी आहे “महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयॊग महामंडळ” Maharashtra State Khadi and Village Industries Boards (KVIB). आम्ही या लेखात cmegp scheme in marathi मध्ये अगदी सोप्प्या भाषेत मांडणार आहोत.

योजनेची वैशिष्ट्ये Key Features of the CMEGP Scheme

  1. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असते
  2. ३५% पर्यंत अनुदान मिळते
  3. कमीत कमी कागदपत्र
  4. बँकाकडून  प्राधान्याने कर्जवाटप
  5. कमीत कमी मार्जिन मनी
  6. उद्योजकता प्रशिक्षण
  7. रोजगार निर्मिती
  8. ग्रामीण भागाला प्राधान्य

CMEGP योजने अंतर्गत अनुदान  cmegp scheme subsidy details

या योजनेमध्ये प्रामुख्याने चार प्रकारात अनुदान दिले जाते ज्यापैकी दोन प्रकार म्हणजे ग्रामीण व शहरी आणि इतर दोन म्हणजे सामाजिक आरक्षणावर आधारित जेणेकरून समाजामधील दुर्लक्षित घटकांना या योजनेचा लाभ घेता यावा.

प्रकल्प खर्चावर आधारित अनुदान
प्रकल्पाचे स्थानग्रामीणशहरी
सामान्य प्रवर्ग२५%१५%
विशेष प्रवर्ग(अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / दिव्यांग / माजी सैनिक)३५%२५%

CMEGP Scheme मध्ये मिळणारी अनुदान रक्कम (CMEGP Subsidy)

अनुदान रक्कम (Subsidy limit)
प्रकल्पाचे स्थानग्रामीण (उत्पादन)ग्रामीण (सेवा)शहरी (उत्पादन)शहरी (सेवा)
सामान्य प्रवर्ग१२.५० लाख२.५० लाख७.५० लाख१.५० लाख
विशेष प्रवर्ग१७.५० लाख३.५० लाख१२.५०लाख२.५० लाख

CMEGP योजनेसाठी पात्रता निकष cmegp scheme eligibility

  1. महाराष्ट्रातील कोणताही नागरिक असावा ज्याचे वय १८ ते ४५ वर्ष आहे. विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष वयोमर्यादा शिथील आहे म्हणजेच त्यांच्यासाठी वय वर्ष ५० पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आहेत.
  2. cmegp scheme हि रोजगार निर्मिती योजना आहे त्यामुळे यासाठी कुठलीही उत्पन्नाची अट नाही.
  3. वैयक्तिक लाभार्थी, प्रोपरायटरशिप, पार्टनरशिप किंवा बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  4. रु. १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु रु १० लाख ते रु २५ लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान सातवी पास असावा आणि रु. २५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान दहावी पास असावा.
  5. कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
  6. तसेच इतर कुठल्याही योजनेअंतर्गत जर आपण अगोदर अनुदानाचा लाभ घेतला असेल तरीही आपण या योजनेसह पात्र नाहीत.

प्रकल्प खर्चाची मर्यादा (Eligible Project Cost for CMEGP Scheme)

बहुतेक व्यवसाय दोन भागामध्ये विभागलेले आहेत त्यापैकी एक उत्पादन आधारीत उद्योग व सेवा आधारित उद्योग, या दोन्ही घटकासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा वेगवेगळी आहे.

प्रकल्प खर्च मर्यादा
उत्पादन क्षेत्र५० लाख
सेवा क्षेत्र१० लाख

Cmegp अंतर्गत  कर्ज मर्यादा (cmegp loan limit)

क्षेत्रनिहाय कर्ज मर्यादाकर्ज मर्यादा
उत्पादन क्षेत्र (सामान्य प्रवर्ग)४५ लाख
सेवा क्षेत्र (सामान्य प्रवर्ग)९ लाख
उत्पादन क्षेत्र (विशेष प्रवर्ग)४७.५० लाख
सेवा क्षेत्र (विशेष प्रवर्ग)९.५० लाख

प्रवर्ग निहाय कर्ज मर्यादा

प्रवर्ग निहाय कर्ज मर्यादाकर्ज मर्यादा
सामान्य प्रवर्ग९०%
विशेष प्रवर्ग(अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / दिव्यांग / माजी सैनिक)९५%

CMEGP scheme साठी स्वगुंतवणुक (Own Contribution/cmegp Margin)

स्वगुंतवणूक / मार्गिन मनी
सामान्य प्रवर्ग१०%
विशेष प्रवर्ग(अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / दिव्यांग / माजी सैनिक)५%

CMEGP Scheme अंतर्गत पात्र उद्योग व प्रकल्प (cmegp maharashtra business list)

या योजनेअंतर्गत बहुतेक सर्व उत्पादन प्रकल्प (cmegp maharashtra udyog list), सेवा क्षेत्रातील प्रकल्प (cmegp udyog list) पात्र आहेत. पुढे दोन्ही क्षेत्रातील व्यवसायाची यादी दिलेली आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल कि कुठले उद्योग पात्र आहेत.

उत्पादन क्षेत्र (प्रकल्प खर्च मर्यादा रु. ५० लाख) Manufacturing Project List

  1. रेडिमेड गारमेंट
  2. मिल्क प्रॉडक्ट्स (तुप, खवा, आइसक्रीम, पनीर इ)
  3. मिनरल वॉटर प्लांट
  4. गांढूळ खत निर्मिती
  5. टिन पत्रा तयार करणे
  6. अलुमिनियमची भांडी तयार करणे
  7. कुलर बनवणे
  8. गुळ उत्पादन
  9. बेकरी उत्पादन (बेकरी प्रॉडक्ट तयार करणे फक्त विकणे नाही)
  10. फर्निचर तयार करणे
  11. फॅब्रिकेशन
  12. तेल घाना व पॅकेजिंग
  13. गादी / कुशन तयार करणे
  14. डिजिटल प्रिंटिंग
  15. पेपर प्रॉडक्ट्स (बॅग्स, प्लेट्स, ग्लास)
  16. दाल मिल
  17. हळद प्रक्रिया
  18. भाज्या निर्जलीकरण (कांदा पावडर)
  19. पशुखाद्य
  20. अगरबत्ती उत्पादन
  21. पापड, मसाले, लोणचे उत्पादन
  22. शेती अवजार उत्पादन
  23. मध उत्पादन
  24. फूड प्रॉडक्ट्स
  25. सोया मिल्क
  26. सिमेंट प्रॉडक्ट्स
  27. फळे व भाजीपाला प्रोसेससिंग
  28. निंबोळी अर्क तयार करणे

बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ९.७५ लाखाच्या कर्जासाठी)

बेकरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ५.०० लाखाच्या कर्जासाठी)

पापड उद्योगासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (रु. ५.८० लाखाच्या कर्जासाठी)

डेअरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (५ गाय/म्हैस)

डेअरी व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (१० गाय/म्हैस)

सेवा क्षेत्रातील प्रकल्प (रु १० लाखापर्यंत) Service Sector Project List

  1. ई सेवा केंद्र
  2. झेरॉक्स सेंटर
  3. टायपिंग डि टी पी जॉब वर्क
  4. टी स्टॉल
  5. मेस
  6. टेलरिंग
  7. पिठाची चक्की
  8. मिरची कांडप
  9. फोटोग्राफी
  10. सर्व्हिसिंग सेंटर
  11. मोबाइल रिपेअर
  12. इंजिनीरिंग वर्क्स
  13. मालवाहतूक व्यवसाय
  14. डिजिटल प्रिंटिंग
  15. इलेकट्रीशन
  16. प्लम्बिंग
  17. व्हील अलाइनमेंट
  18. मंडप डेकोरेशन
  19. सलून
  20. ब्युटीपार्लर
  21. मळणी यंत्र

योजनेची अंमलबजावणी करणारे शासकीय विभाग CMEGP Scheme

महाराष्ट्रात CMEGP Yojana दोन विभागामार्फत राबवली जाते

  1. जिल्हा उद्योग केंद्र
  2. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ

कर्ज देणाऱ्या बँका (cmegp bank list)

  1. सर्व सरकारी बँका
  2. सर्व ग्रामीण बँका
  3. सर्व प्रायव्हेट बँक

CMEGP Scheme ची प्रोसेस स्टेप बाय स्टेप (CMEGP Scheme process step by step)

  1. अर्जदाराने CMEGP च्या या वेबसाईट (CMEGP वेबसाईट) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, कोणत्याही परिस्थिती इतर मार्गाने अर्ज करता येणार नाही.
  2. अर्ज प्राप्त झाल्यावर जिल्हास्तरीय समिती या अर्जाची पडताळणी करते व प्राथमिक पात्र अर्जदारांची निवड करते.
  3. जिल्हास्तरीय समिती पात्र अर्जदारांची यादी अर्जदारांनींच सुचवलेल्या बँकेकडे  पाठवते. 
  4. बँकेकडे पाठवलेल्या अर्जाची बँक पडताळणी करते आणि रिसर्व्ह बँकेच्या नियमानुसार कर्जासाठी पात्र आहे का ते तपासते. जर बँकेला वाटले कि प्रोजेक्ट मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर बँक असे अर्ज जिल्हास्तरीय समितीला परत पाठवते.
  5. बँक प्राथमिक मंजुरी देते व CMEGP पोर्टलवर लॉगिन करून कर्ज मंजुरी पात्र अपलोड करते.
  6. बँकेने मंजुरीपत्र अपलोड केल्यानंतर अर्जदाराला EDP Training साठी जिल्हा उद्योग केंद्राला संपर्क साधावा.
  7. आपली EDP Training पूर्ण झाल्यावर ट्रैनिंग चे प्रमाणपत्र बँकेत जमा करावे, ते प्रमाणपत्र बँक त्यांच्या लॉगिन आयडी मधून CMEGP च्या पोर्टलवर अपलोड करते.
  8. त्यानंतर बँक कर्ज वितरण करते व कर्ज वितरण झाल्यानंतर हि कर्ज वितरणाची माहिती CMEGP पोर्टलवर अपलोड करते व अनुदानाच्या रकमेची मागणी करते. अनुदान रकमेपेक्षा जास्त रक्कम वितरण केली असेल तरच अनुदांनसाठी क्लेम करता येतो.
  9. जिल्हास्तरीय समिती क्लेम ची पडताळणी करून हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने CMEGP cell मुंबई ला पाठवते जे बँकेला आपले अनुदान पाठवते.
  10. हि अनुदानाची रक्कम बँकेला प्राप्त झाल्यावर हि रक्कम बँक आपल्या कर्ज खात्याला अशी लिंक करते जेणेकरून आपल्याला या रकमेवरती व्याज लागत नाही.
  11. तीन वर्षानंतर आपल्ला प्रकल्प समाधानकारक चालू असेल आणि आपण आपले कर्ज व्यवस्थितरीत्या परतफेड करत असाल तर बँक हि अनुदानाची रक्कम आपल्या कर्ज खात्याला जमा करते.
  12. हि रक्कम जमा करण्यासाठी बँकेला जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी घ्यावी लागेल.
  13. वरील सर्व प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते व पूर्णपणे पारदर्शक असते.

CMEGP Scheme अंतर्गत मिळणाऱ्या बँक कर्जासंबंधी (cmegp loan details)

CGTMSE : या कर्जाला बँकेकडून कोणतीही कोलॅटरल तारण मालमत्ता मागितली जात नाही परंतु आपले कर्ज CGTMSE खाली कव्हर करणे बंधनकारक आहे. CGTMSE बद्दल अधिक माहितीसाठी हा लेख नक्की वाचा (CGTMSE योजनेची थोडक्यात ओळख)

लोकसंखेचा निकष

२०११ च्या जनगणनेनुसार २०००० लोकसंख्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागाला ग्रामीण समजले जाते व २०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागाला शहरी समजले जाते व त्यानुसार अनुदानाची टक्केवारी ठरवली जाते. यासाठी आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून लोकसंख्येचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.

कागदपत्रे cmegp documents list

खालील कागदपत्रे या योजनेसाठी लागतात आणि ती कागपत्रे पोर्टलवर आपल्या लॉगिन मधून अपलोड करायची सुविधा दिलेली असते.

  1. पासपोर्ट साईझ फोटो
  2. आधार कार्ड
  3. रहिवाशी प्रमाणपत्र
  4. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  5. हमी पत्र (Undertaking Form for CMEGP Scheme)
  6. प्रोजेक्ट रिपोर्ट
  7. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  8. ट्रैनिंग प्रमाणपत्र (EDP Training Certificate)
  9. स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र (दिव्यांग प्रमाणपत्र)

उद्योजगता विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme)

CMEGP Scheme अंतर्गत पात्र सर्व अर्जदारांना उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत ट्रैनिंग घेणे बंधनकारक असते. या ट्रैनिंग मध्ये व्यवसायासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात जसे कि आर्थिक नियोजन, व्यवस्थापकीय कौशल्य, मार्केटिंग, अकाउंटिंग इ. EDP ट्रैनिंग चा कालावधी सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी एक आठवड्याचा आहे व उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पासाठी दोन आठवड्याचा आहे.

व्यवसाय नोंदणी Business Registration

या CMEGP Scheme अंतर्गत कर्ज प्रकरण करण्यासाठी आपला व्यवसाय उद्योग आधार नंबर काढून घेणे बंधनकारक आहे, आपण जर अजून पर्यंत याअंतर्गत नोंदणी केली नसेल तर आपण खालील वेबसाईट वरून निशुल्क नोंदणी करू शकता.

CMEGP Scheme साठी पात्र नसलेले व्यवसाय (List of Negative Activities under CMEGP)

  1. कत्तलखाना
  2. मास प्रक्रिया
  3. बिडी, पान, सिगारेट उद्योग
  4. मद्य विक्री व मद्य विक्री करणारे हॉटेल
  5. शेती मशागत
  6. फळ शेती, फुलशेती, रेशीम शेती
  7. शेळीपालन, कुक्कुटपालन
  8. प्रदूषण महामंडळाने किंवा शासनाने बॅन केलेल्या वस्तू

CMEGP योजनेमध्ये बँकांची भूमिका

विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये, कर्जासाठी वित्तपुरवठा करण्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. या संस्था उद्योजकांना व्यवसाय उपक्रम सुरू करण्यासाठी, तांत्रिक क्षमता सुधारण्यासाठी, कच्चा माल खरेदी करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी कर्जपुरवठा आवश्यक असतो आणि यामध्ये बँकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

व्यवसायात तंत्राद्यानाचा वापर

आजकाल प्रत्येक व्यवसायामध्ये डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब महत्वाचा झाला आहे. प्रत्येक उद्योग कार्य, ग्राहक सेवा आणि एकूण स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान-आधारित बदल स्वीकारत आहेत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनद्वारे, डेटा अनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग प्रगती करीत आहेत.

CMEGP Scheme साठी द्यावयाचे हमी पत्र

CMEGP Scheme अंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला खालील हमीपत्र देणे बंधनकारक आहे.

हमीपत्र (Undertaking)

मी, (पूर्ण नाव), राहणार (पूर्ण पत्ता), हमीपत्र लिहून देतो की, मी CMEGP ची मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी व शर्ती वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत. योजना, पात्रता निकष जसे की वय, पात्रता, अधिवास महाराष्ट्र, योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरी/ग्रामीण भागांचे स्वतःचे योगदान आणि व्याख्या योजना मार्गदर्शक तत्त्व यांची माहिती घेतली.

महाराष्ट्र सरकार अंतर्गत उद्योग संचालनालय च्या खाली CMEGP हि योजना आहे आणि सीएमईजीपी योजना जिल्हास्तरीय उद्योग केंद्र (DIC) आणि खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत (KVIB) राबविण्यात येते याची मला माहिती आहे.

CMEGP अंतर्गत अर्ज जिल्हा उद्योग केंद्राकडे ऑनलाइन सबमिट करावा लागतो याची मला कल्पना आहे. माझ्या अर्जाची जिल्हास्तरीय समितीद्वारे छाननी केली जाईल आणि पात्र आणि योग्य आढळल्यास संबंधित बँकांना शिफारस केली जाईल.

जिल्हा स्तरीय टास्क फोर्स समिती (DLTFC) याचेकडे बँकेकडे प्रस्तावाची शिफारस करण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. बँकेद्वारे प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासली जाईल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव जर बँकेने प्रस्ताव नाकारला तर तो निर्णय मला मान्य असेल.

एका कुटुंबातील फक्त एक व्यक्ती आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी पात्र आहे. CMEGP अंतर्गत ‘कुटुंब’ म्हणजे स्वतः आणि जोडीदाराचा समावेश होतो.

मला याची पूर्ण कल्पना आहे की सबसिडी ही महाराष्ट्र सरकारकडून “एक वेळची मदत” आहे आणि हि बॅक-एंडेड सबसिडी (Back Ended Subsidy) आहे, म्हणजेच हि सबसिडीची रक्कम कर्जाच्या जोडलेली असते व ती मला तेव्हाच मिळेल जेव्हा उर्वरित कर्ज परतफेड करेल आणि  तीही तीन वर्षाच्या लॉक इन कालावधी नंतर.

जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग महामंडळ (प्रायोजक एजन्सी) दावा स्वीकारु किंवा नाकारू शकता. यासाठी कोणत्याही न्यायालयासमोर डीआयसी किंवा केव्हीआयबी विरुद्ध कोणतीही कायदेशीर कार्यवाही करणार नाही. मी घोषित करतो की मी स्वयंरोजगाराशी संबंधित केंद्र सरकार, राज्य सरकार, महामंडळ इतर कोणत्याही अनुदानाचा लाभार्थी नाही.

आवश्यक असणारा 1 आठवड्याचा (सेवा क्षेत्रासाठी) उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम (REDP)” किंवा 2 आठवडे (उत्पादन क्षेत्रासाठी) मी पूर्ण करील.

माझ्या प्रकल्पाच्या ठिकाणी मी मुख्य प्रवेशद्वारावर खालील साइन-बोर्ड प्रदर्शित करण्यास सहमत आहे: –

मी माझा प्रोजेक्ट व्यवस्थित रित्या चालवण्यास असमर्थ ठरल्यास मी सर्व कर्ज रक्कम परतफेड करील तसेच अनुदानाची सर्व रक्कम परत करेल.

मी DIC किंवा KVIB, बँक आणि किंवा अधिकृत एजन्सीच्या अधिकाऱ्यांना माझा प्रोजेक्टची पडताळणी करण्यास परवानगी देतो तसेच सर्व माहिती प्रदान करेल. तसेच लागणारी सर्व कागदपत्रे जमा करेल.

या हमीपत्राद्वारे असे घोषित करतो की मी अर्जासोबत दिलेली सर्व माहिती आहे बरोबर आणि कोणतीही माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास DIC किंवा KVIB इतर कोणतीही कायदेशीर कार्यवाही किंवा खटला चालवू शकतात.

कर्जासंबंधी सर्वात महत्त्वाचे: बॅंकेत कर्जमागणीसाठी जाताना कसा दृष्टीकोन ठेवावा.

बॅंकेत गेल्या गेल्या बॅंक अधिकार्यांना सांगू नये कि आपल्याला cmegp अंतर्गत कर्ज करायचे आहे कारण बॅंकेला आपण कोणत्या योजनेत कर्ज करत आहात यांच्याशी काही देणे घेणे नसते, बॅंक ज्या व्यवसायासाठी कर्ज देणार आहे किंवा ज्याला कर्ज देणार आहे यांच्याविषयी जानून घेण्यात रस असतो.

त्यामुळे आपण असे कधीही समजू नये कि बॅंकेला या योजनेत आपल्याला कर्ज देणे बंधनकारक आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा बॅंका चांगल्या कर्जदारांना कर्ज देणारच असतात तरीही कर्ज मिळणं हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे बॅंकेत कर्ज मागू नये, आपल्या वागण्यात नेहमी नम्रपणा असावा. तुमच्यासाठी हे कर्ज प्राथमिकता असू शकते पण बॅंक अधिकार्यांसाठी यांच्याही पेक्षा इतर कितीतरी महत्वाची कामे असु शकतात.

बॅंकेत जाण्याआधी आपल्या व्यवसायाविषयी व आपल्या प्रकल्पाविषयी पुर्ण माहिती घेऊन जावे. आपल्या व्यवसायाविषयी अंदाजित प्रश्नांची उत्तरे तयार ठेवावीत.

आपल्या व्यवसायाविषयी प्रकल्पाविषयी सर्व माहिती सांगून झाल्यानंतर व बॅंकेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यानंतर आपण या योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज करणार आहोत हे सांगावे जेणेकरून बॅंकेला वाटणार नाही कि तुम्ही फक्त अनुदानासाठी कर्ज करत आहात.

CMEGP Scheme चा ऑनलाईन फॉर्म खाली दिलेला आहे वेबसाईट वर दिलेला फॉर्म भरण्याअगोदर खालील फॉर्म नीट वाचून घ्यावा.

cmegp scheme in marathi

cmegp scheme in marathi

cmegp scheme details

cmegp scheme subsidy

cmegp scheme subsidy details

cmegp scheme information in marathi

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

3 thoughts on “CMEGP योजना । १७.५० लाखापर्यंत अनुदान । CMEGP scheme information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *