General

आण्णासाहेब पाटील महामंडळची व्याज परतावा योजना (Annasaheb Patil Mahamandal Interest Reimbursement Scheme)

महाराष्ट्रामध्ये विविध समाजासाठी त्यांचा आर्थिक विकास व्हावा म्हणून त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी वेगवेगळी महामंडळे आहेत परंतु या सर्वांमध्ये मराठा समाजासाठी विशेष असे आर्थिक महामंडळ नव्हते व त्यासाठी मराठा समाजातून त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे हि खूप पूर्वीपासूनची मागणी आहे. या मागणीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंळाची (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) महाराष्ट्रामध्ये स्थापना केले. 

Annasaheb Patil Arthik Vikas महामंडळामार्फत होतकरू उद्योग करू इच्छित मराठा तरुणांसाठी कर्जाच्या व्याज परताव्याची (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Interest Reimbursement Scheme) योजना चालविली जाते ज्यामध्ये व्यवसायासाठी विविध कर्ज घेणाऱ्या तरुणांसाठी बँकेच्या एकूण व्याजदारापैकी काही भाग व्याज परतावा म्हणून कर्जदाराला मिळते.

या योजनेअंतर्गत प्रामुख्याने दोन प्रमुख योजना आहेत यामध्ये एक आहे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी (Interest Reimbursement Scheme for Individuals) व्याजपरतावा योजना आणि दुसरी आहे सामूहिक कर्ज घेणाऱ्यासाठी (Interest Reimbursement Scheme for Firms, Groups etc). या दोन्ही योजनेत फक्त व्यवसायासाठी घेतलेले कर्ज पात्र आहेत. चला तर मग आपण एक एक करून या दोन्ही योजनांची माहिती घेऊ.

वैयक्तिक व्याज परतावा योजना

आण्णासाहेब पाटील (annasaheb patil mahamandal) आर्थिक विकास महामंडळची व्याज परतावा योजनेमध्ये ज्यांनी वैयक्तिकरित्या आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज घेणार आहेत ते अर्जदार पात्र आहेत, हो घेणार आहेत तेच कारण पूर्वी पासून असलेल्या कर्जासाठी हि योजना नाही.

वैयक्तिक व्याज परतावा योजनेसाठी पात्रता (Eligibility for Interest Reimbursement Scheme for Individuals)

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे.
  • वयोमर्यादा : पुरुषांसाठी १८ ते ५० वर्षे व महिलांसाठी १८ ते ५५ वर्षे
  • अर्जदार मराठा समाजाचा असला पाहिजे किंवा अशा समाजाचा असावा ज्यांच्यासाठी असे विशिष्ट महामंडळ नाही.
  • उमेदवार आर्थिक मागास घटकातील असावा म्हणजेच त्यांचे कौंटुबिक उत्पन्न रु. ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • जर आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत सामायिक रित्या कर्ज घेणार असाल तर पहिल्या व्यक्तीच्या नावाने Letter of Intent (LOI) असावे.
  • कर्ज घेताना महाराष्ट्रातीलच कोणत्याही बँकेच्या शाखेतून घ्यावे.

व्याज परतावयाची पद्धत (Interest Reimbursement Process)

  • जास्तीत जास्त रु. १० पर्यंतच्या कर्जासाठी योजना आहे.
  • आपण बँकेकडून आपल्या गरजेनुसार जास्त रकमेचे कर्ज घेऊ शकता परंतु आपल्याला व्याज परतावा फक्त रु. १० लाख रकमेवरील व्याजाचा मिळेल.
  • ५ वर्षापर्यंत व्याज परतावा मिळेल
  • वार्षिक १२% व्याजदराप्रमाणे व्याज परतावा मिळेल
  • जास्तीत जास्त रु. ३ लाखापर्यंत व्याज परतावा मिळेल.

Letter of Intent (LOI) साठी लागणारी कागदपत्रे

१. आधार कार्ड

२. रहिवाशी पुरावा (खालील पैकी एक)

  • तहसीलदार रहिवाशी प्रमाणपत्र
  • सध्याचे लाईट बिल 
  • सध्याचे गॅस पासबुक 
  • टेलिफोन बिल 
  • राशन कार्ड
  • पासपोर्ट 
  • भाड्याने राहत असाल तर भाडे करार

३. तहसीलदार उत्पन्नाचे प्रमाणपत्र 

४. जात प्रमाणपत्र 

५. शाळा सोडल्याचा दाखल

आण्णासाहेब पाटील महामंडळ (Annasaheb Patil Mahamandal) योजनेअंतर्गत व्याज परतावा घेण्याची प्रोसेस

  1. वरील पात्रता जर आपण पूर्ण करत असाल तर आपण महामंडळाच्या वेबसाईट वर लॉगिन करून आपल्याला L.O.I (Letter of Intent) मिळू शकतो.
  2. एक लक्षात असू द्या बँकेचे कर्ज मंजुरीच्या आधीच L.O.I (Letter of Intent) असला पाहिजे.
  3. आपल्या कर्जाच्या इतर कागपत्रासोबत L.O.I (Letter of Intent) बँकेत सादर करावा
  4. बँक हा L.O.I (Letter of Intent) आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या वेबसाईट वरून व्हेरिफाय करून घेईल.
  5. आण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्याला पहिला महिन्याचा हप्ता (मुद्दल + व्याज) याचा परतावा देईल व त्यापुढील महिन्याचे व्याज.
  6. महामंडळ फक्त त्याच लाभार्थ्यांचा व्याज परतावा देणार ज्यांनी त्यांचा कर्जाचा हफ्ता वेळेवर भरला आहे.
  7. जर आपले कर्ज CGTMSE या योजनेखाली कव्हर असेल तर महामंडळ CGTMSE फीसचा परतावा  सुद्धा मिळेल.
  8. आपण दर महिन्याला आपल्या कर्ज खात्याचे स्टेटमेंट बँकेतून घेऊन ते आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या (annasaheb patil mahamandal) पोर्टल वर आपल्या लॉगिन मध्ये जाऊन अपलोड करावे जेणेकरून महामंडळाला कळेल कि आपला हप्ता वेळेवर गेला आहे आणि महामंडळ आपला व्याज परतावा पाठवेल.

Annasaheb Patil Mahamandal सामूहिक लाभार्थी व्याज परतावा योजना (Interest Reimbursement Scheme for Firms, Groups)

सामूहिकरित्या घेतलेल्या कर्जाला सुद्धा हि व्याज परतावा योजना आहे, ज्यामध्ये पार्टनरशिप संस्था, सहकारी संस्था, बचत गट, इतर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी.

सामूहिक लाभार्थी व्याज परतावा योजनेसाठी पात्रता

  • सर्व सभासद महाराष्ट्राचे रहिवाशी असावेत
  • सभासदांचे वय पुरुषांसाठी १८ ते ५० वर्षे व महिलांसाठी १८ ते ५५ वर्षे
  • कमीत कमी ६०% सभासद मराठा समाजाचे असावेत.
  • सर्व सभासद आर्थिक मागास असावेत ज्यांचे वार्षिक कौंटुबिक उत्पन्न रु. ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  1. कर्ज हे महाराष्ट्रातील बँक शाखेतून घेणार असावे.
  2. जास्तीत जास्त रु. ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज रकमेवरच्या व्याजावरच परतावा मिळेल.
  3. पाच वर्षाच्या कालावधीसाठी व्याज परतावा मिळेल.
  4. १२% वार्षिक व्याजदारपर्यंत व्याज परतावा मिळू शकतो.
  5. जास्तीत जास्त रु. १५ लाखापर्यंत व्याज परतावा मिळेल.

सामूहिक लाभार्थी व्याज परतावा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • सर्व सभासदांचे आधार कार्ड
  • सर्व सभासदांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदारांचे) किंवा इन्कम टॅक्स रिटर्न
  • सर्वांचे जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला

लाभार्थी कंपनी असेल तर कागदपत्रे

  • सर्व संचालकांचे आधार कार्ड
  • संचालकांचे DIN (लागू असेल तर)
  • कंपनीचे CIN (लागू असेल तर)
  • कंपनीचे PAN (लागू असेल तर)
  • कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र
  • वरील पात्रता पूर्ण करणाऱ्या समूहाला LOI (Letter of Intent) मिळू शकतो.
  • यात सुद्धा व्याज परतावा आपण वेळेवर परतफेड केलेल्या हफ्त्यांसाठीच मिळतो.

व्याज परतावा मिळवण्याची प्रोसेस व त्यासाठीची कागदपत्रे

  • बँकेचे मंजुरी पत्र (त्यामध्ये कर्जाची संपूर्ण माहिती असावी)
  • कर्जाच्या हफ्त्याचे वेळापत्रक
  • कर्ज वितरणाचा पुरावा (कर्जाचे स्टेटमेंट बँकेच्या सही शिक्क्यासह)
  • व्याज परताव्याची आपण तो कर्जाचा हफ्ता वेळेवर भरला असला पाहिजे.
  • हि सर्व कागदपत्रे आपल्या महामंडळाच्या लॉगिन मध्ये जाऊन अपलोड करावी.

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

3 thoughts on “आण्णासाहेब पाटील महामंडळची व्याज परतावा योजना (Annasaheb Patil Mahamandal Interest Reimbursement Scheme)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *