Generalकर्ज (Loans)व्यवसाय (Business)

विश्वकर्मा योजना । कुशल कारागिरांसाठी रु. १५,०००/- अनुदान । २,००,०००/- पर्यंत विनातारण कर्ज (PM Vishwakarma Yojana)

आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे, हे कारागीर सामान्यतः त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात. त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरुंकडून विविध कलाकुसर करण्याचा वारसा लाभलेला असतो. या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. या कुशल कारागिरांना “विश्वकर्मा” म्हणून संबोधले जाते, यामध्ये लोहार, कुंभार, सुवर्णकार, सुतार यांसारखे कुशल कारागीर समाविष्ट असतात. या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “विश्वकर्मा योजना” (vishwakarma yojana) सुरु केलेली आहे, या योजनेअंतर्गत या कुशल कारागिरांची गुणवत्ता सुधारणे, उत्पादन वाढवणे, उत्पादन देशपातळीवर व जागतिक पातळीवर पोहोचवणे आणि या सर्वातून या कुशल कारागिरांची आर्थिक स्थिती उंचावणे त्यासोबतातच यांनी तयार केलेल्या वस्तूंचा व यांच्या कलेचा वारसा जपणे हा या विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे. या लेखामाध्ये आपण विश्वकर्मा योजनेची माहिती मराठी मध्ये बघूया (vishwakarma yojana information in Marathi).

विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे (Objective of Vishwakarma Yojana in Marathi)

Table of Contents

  1. कुशल कारागिरांना एक चांगली ओळख निर्माण करून देणे व विश्वकर्मा योजनेचे फायदे (Benefits of vishwakarma yojana in Marathi) त्यांच्या पर्यंत पोहोचवणे.
  2. त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
  3. क्षमता, उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगल्या आणि मॉडर्न टूल्स उपलब्ध करून देणे.
  4. अगदी सोप्प्या पद्धतीने विनातारण कर्ज उपलब्ध करणे.
  5. कमीत कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देणे.
  6. ऑनलाईन व्यवहार करावा म्हणून प्रोत्साहन रुपी अनुदान देणे.
  7. त्यांची कला, वस्तू, प्रॉडक्ट्स ला चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी चांगले व्यासपीठ निर्माण करून देणे.
  8. कुशल कारागिरांमध्ये सोशल सेक्युरिटी स्कीम बद्दल जागरूकता निर्माण करून प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल पेंशन योजना या योजनांमध्ये सहभाग वाढवणे.

PM विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता (Vishwakarma Yojana Eligibility)

  1. योजनेसाठी पात्रता वय कमीत कमी १८ असायला हवे.
  2. अर्जदाराने यापूर्वी मागील ५ वर्षात केंद्र किंवा राज्यसरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत उदा. PMEGP, CMEGP, मुद्रा योजना (Mudra Loan), PM Swanidhi योजना कर्ज घेतलेले नसावे.
  3. मुद्रा योजना, PM Swanidhi योजनेअंतर्गत कर्ज घेऊन ते पूर्ण परतफेड केलेले असेल ठरते या योजनेसाठी पात्र आहेत
  4. एका कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र असेल.
  5. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती योजनेसाठी पात्र नाहीत.

विश्वकर्मा योजनेसाठी (vishwakarma scheme) पारंपारिक साहित्याच्या मदतीने काम करणारे कुशल कारागीर पात्र असतील, खाली या योजनेअंतर्गत पात्र कुशल कारागिरांची यादी दिलेली आहे, सरकारने सांगितल्याप्रमाणे या यादीमध्ये भविष्यात अजून कुशल कारागिरांचा व कार्याचा समावेश होऊ शकतो. (List of Eligible Scheme for vishwakarma yojana in Marathi).

  1. सुतार : आपल्या पारंपरिक साहित्यांनी लाकडी वस्तू तयार व दुरुस्ती करणारे.
  2. लाकडी होड्या तयार करणारे.
  3. विविध शेतीउपयोगी हत्यार तयार करणारे जसे कि कुऱ्हाड, खुरपी , विळे इ.
  4. लोहार : लोखंडी किंवा अलुमिनियमची भांडी बनवणारे
  5. कुशल कारागिरांना लागणारे टूल्स तयार करणारे.
  6. चावी तयार करणारे किंवा कुलूप दुरुस्त करणारे.
  7. मूर्तिकार, दगडाच्या मूर्ती तयार करणारे.
  8. सोनार, सुवर्णकार, सोन्याचांदीचे दागिने करणारे.
  9. कुंभार: मातीची भांडी तयार करणारे, मातीची मूर्ती करणारे.
  10. चांभार : चप्पल बूट तयार करणारे (जसे कोल्हापुरी चपला तयार करणारे)
  11. घर बांधकाम करणारे गवंडी, मिस्त्री, फरशी बसवणारे.
  12. बांबूच्या टोपली बनवणारे, झाडू तयार करणारे, हाताने पायपुसण्या किंवा दोऱ्या तयार करणारे.
  13. हातानी खेळणी बनवणारे.
  14. नाव्ही, सलून , ब्युटी पार्लर चालवणारे.
  15. फुलांचे हार, डेकोरेशन करणारे.
  16. धोबी, इस्त्री करणारे.
  17. टेलर, शिंपी.
  18. मासे पकडण्याची जाळी तयार करणारे.

विश्वकर्मा योजनेचे फायदे (Benefits of Vishwakarma Yojana in Marathi)

विश्वकर्मा योजना ओळखपत्र व प्रमाणपत्र PM Vishwakarma Yojana ID Card and Certificate

योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कारागिरांना विश्वकर्मा योजनेचे ओळख पत्र (vishwakarma yojana identity card) आणि कुशल कारागीर असलेचे प्रमाणपत्र मिळेल. या ओळखपत्राचा व प्रमाणपत्राचा उपयोग आपल्याला योजनेचा पुढील फायदा घेण्यासाठी होईल.हे ओळखपत्र व प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात व फिजिकल स्वरूपात मिळेल.

विश्वकर्मा योजनेचे ओळख पत्र व प्रमाणपत्रासाठी (Certificate of vishwakarma yojana) पुढील लिंक वर जाऊन नोंदणी करा:

कौशल्य विकास प्रशिक्षण

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा तीन टप्प्यात घेतला जातो कौशल्य तपासणी, बेसिक प्रशिक्षण, ऍडव्हान्स प्रशिक्षण.

  1. कौशल्य तपासणी (Skill Verification): विश्वकर्मा योजनेअंतर्गत पोर्टल वर नोंद केलेल्या सर्वांची कौशल्य तपासणी केली जाईल ज्याद्वारे लाभार्थीला कोणते कौशल्य आहे, त्यात कशी सुधारणा करता येईल, कशाप्रकारचे प्रशिक्षण दिल्यावर याची गुणवत्ता वाढेल या बाबींचा विचार केला जातो. हि तपासणी किंवा चाचणी म्हणजे एक साधी वेरिफिकेशन पद्धत असणार आहे ज्यात पहिले जाईल कि आपल्याला ते काम येते कि नाही. त्यामुळे जे कुशल कारागीर आहेत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही कारण आपण जे काम करता त्याबद्दलच हि तपासणी असणार आहे.
  2. बेसिक प्रशिक्षण: एकदा का आपले कौशल्य तपासणी झाली कि आपल्याला आपले कौशल्य विकासासाठी एक बेसिक प्रशिक्षण दिले जाईल.या प्रशिक्षणामुळे कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होईल, गुणवत्तेत वाढ होईल. या प्रशिक्षणामध्ये कारागिरांना आधुनिक टूल्स चे प्रशिक्षण दिले जाईल, डिजिटल व आर्थिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणानंतर आपली आपल्या बँकेकडे रु. १,००,०००/- च्या कर्जासाठी शिफारस करण्यात येईल. जेणेकरून आपल्याला रु १ लाख विनातारण कर्ज मिळेल.
  3. ऍडव्हान्स प्रशिक्षण कार्यक्रम: लाभार्थीला जर पुढील ऍडव्हान्स प्रशिक्षण घ्यावयाचे (advance training programme under vishwakarma yojana) असेल तर ते घेऊ शकतात. हे प्रशिक्षण १२० तासांचे व १५ दिवसांचे असेल. हे प्रशिक्षण लाभार्थ्याला स्वयंरोजगारापासून उद्योजकतेकडे नेणारे असेल तसेच यामध्ये लेटेस्ट तंत्रद्यान, डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग याचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण केलेल्यांना विश्वकर्मा योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील रु. २,००,०००/- विनातारण कर्ज मिळू शकेल.

प्रशिक्षण भत्ता (Stipend under vishwakarma yojana)

प्रशिक्षण चालू असताना  आपल्याला रु ५००/- प्रतिदिवस अनुदान मिळेल (प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर) जेणेकरून कारागिरांचे काम बंद ठेऊन प्रशिक्षणाला गेल्याने आर्थिक नुकसान होऊ नये. त्यासोबतच प्रशिक्षणाच्या ठिकाणी राहण्याचा व जेवणाचा खर्च ती संस्था करेल. त्यामुळे कारागिरांना कोणताही खर्च या प्रशिक्षणासाठी लागणार नाही व अनुदानामुळे आर्थिक नुकसानही होणार नाही.

टूलबॉक्स साठी अनुदान (Toolbox incentive under PM vishwakarma yojana)

बेसिक प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थी रु. १५,०००/- “टूलकिट अनुदान” मिळण्यास पात्र होईल. या अनुदानाचा टूलबॉक्स घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल आणि कुशल कारागिरांची गुणवत्ता व उत्पादकता नक्कीच वाढेल.

Toolbox incentive under PM vishwakarma yojana

विश्वकर्मा योजना विनातारण कर्ज योजना (Collateral Free Vishwakarma Yojana Loan)

कौशल्य तपासणी व बेसिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना रु १ लाखाचे विनातारण कर्ज मिळू शकते. या योजनेअंतर्गत एकूण रु ३ लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये रु १ लाख आणि त्यानंतर रु २ लाखाचे कर्ज मिळणार आहे आणि हे दोन्ही कर्ज विनातारण असणार आहेत.

कर्जाचा टप्पाकर्जाची रक्कमपरतफेड कालावधी
पहिला टप्पारु. १,००,०००/- पर्यंत१८ महिने
दुसरा टप्पारु. २,००,०००/- पर्यंत३० महिने

विनातारण कर्जासाठी लागणारे बँकेत कागदपत्र

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. पासपोर्ट साईज फोटो
  4. राशन कार्ड
  5. कौशल्य व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले असावे.
  6. बेसिक प्रशिक्षण पूर्ण असावे.
  7. कुठल्याही बँकेत कर्ज थकीत असू नये.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्जाचा व्याज दर (vishwakarma yojana interest rate)

वरील दोन्ही कर्ज ५% व्याजाने लाभार्थ्यांना मिळतील, यामध्ये महत्वाची बाब म्हणजे लाभार्थ्यांना बँक ५% व्याजदरानेच व्याज आकारणार आहे आणि ५% च्या वरील होणारे व्याज बँकेला सरकारकडून परतावा मिळणार आहे. उदा. बँकेचा व्याजदर १३% असेल तर बँक कर्जदाराला ५% व्याज आकारणार आणि ८% व्याज सरकारकडून परतवला बँकेला मिळेल.

विश्वकर्मा योजनेत विनातारण कर्जासाठी CGTMSE गॅरंटी

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी आपल्याला कोणतेही तारण द्यावयाची आवश्यकता नाही कारण हे कर्ज CGTMSE योजनेखाली कव्हर केलेले आहे. तसेच CGTMSE कव्हर असणाऱ्या इतर कर्जासाठी कर्जदाराला CGTMSE ची वार्षिक फी भरावी लागते परंतु या योजनेत हि वार्षिक फी सरकार स्वतः भरणार आहे.

ऑनलाईन व्यवहारासाठी प्रोत्साहनपर अनुदान

विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी ऑनलाईन व्यवहार करावे यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे (Digital Transaction Incentive under vishwakarma yojana) आणि त्यासाठी लाभार्थ्याला प्रति ऑनलाईन व्यवहार रु. १ असे अनुदान मिळणार आहे. (महिन्याला जास्तीत जास्त रु १००/-). या योजनेत ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यातून जास्तीत जास्त व्यवहार व्हावे व भविष्यात लाभार्त्यांना विविध कर्जासाठी त्यांची पात्रता तयार व्हावी.

वस्तूंची ऑनलाईन विक्री

योजनेअंतर्गत राष्ट्रीय विपणन समिती लाभार्थींना त्यांचे प्रॉडक्ट्स ONDC या लोकप्रिय प्लॅटफॉर्म वर विकण्यासाठी मदत करेल.

नोंदणी प्रक्रिया (Vishwakarma Yojana Online Registration Process in Marathi)

  1. सर्वात प्रथम या योजनेसाठी e-Shram पोर्टलवर नोंद असलेल्या कारागिरांना नोंदणीसाठी प्राथमिकता दिली जाईल.
  2. त्यासोबतच इतर कुशल कारागीर कॉमन सर्व्हिस सेन्टर CSC केंद्रावर किंवा स्वतः ऑनलाईन माध्यमातून रेजिस्ट्रेशन करता येईल.
  3. रेजिस्ट्रेशन साठी आधार कार्ड, मोबाईल न., आधार लिंक बँक खात्याचा तपशील लागेल.
  4. या रेजिस्ट्रेशन प्रोसेस साठी तसेच विश्वकर्मा योजनेचे ओळख पत्र व प्रमाणपत्रासाठी कोणताही खर्च नाही.
  5. रेजिस्ट्रेशन आधार बायोमेट्रिक च्या आधारे होईल.

PM विश्वकर्मा योजना १७.०९.२०२३ रोजी लॉन्च झालेली आहे परंतु अजून पर्यंत हि योजना सर्व राज्यांमध्ये कार्यान्वित झालेली नाही, काही राज्यांत तसेच त्या राज्यातील काही जिल्हात प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित झालेली आहे. खालील लिंक वर आपण थोड्या दिवसाच्या फरकाने चेक करून बघू शकता आपल्या महाराष्ट्रात हि योजना कार्यान्वित झाल्यास खालील लिंक वरून आपल्याला रेजिस्ट्रेशन करता येईल.

पडताळणी व्हेरीफिकेशन (Verification)

स्टेज १: ग्रामपंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिके द्वारे पडताळणी

सर्वात पहिल्या टप्यावर ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका तुम्ही भरलेल्या अर्जाची छाननी करते त्यामध्ये ते तपासतात की तुम्ही पारंपारिक कुशल कारागीर आहेत का, तुमच्या कुटुंबातून फक्त एकच लाभार्थी पात्र ठरेल याची शहानिशा करतो. सामान्यतः ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक हि पडताळणी करेल.

स्टेज २: जिल्हा अंमलबजावणी समिती

ग्रामपंचायत पातळीवर पडताळणी झाल्यावर ग्रामसेवक किंवा नगरपालिका महानगरपालिका असेल तर त्याचा प्रमुख हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने पुढे जिल्हा अंमलबजावणी समिती कडे पाठवतील व ही समिती यांनी केलेल्या पडताळणी ची सत्यता तपासून हा अर्ज पुढे राज्यपातळीवर स्क्रिनिंग समिती कडे पाठवेल.

स्टेज ३: राज्यस्तरीय स्क्रिनिंग कमिटी

जिल्हा अंमलबजावणी समिती कडून आलेले अर्जावर त्यांच्या शिफारसी अनुसार राज्यस्तरीय समिती अर्ज मंजूर करते. जिल्हा व राज्य स्तरावरील समितीचे काम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे त्यामुळे यात कमालीची पारदर्शकता व वेग असेल.

विश्वकर्मा योजना स्टेप बाय स्टेप प्रोसेस PM Vishwakarma Scheme Process Flow

  • स्टेप 1: लाभार्थीची नोंदणी
  • स्टेप 2: ग्रामपंचायत / महानगरपालिका पातळीवरील व्हेरिफिकेशन
  • स्टेप 3: डिजिटल व्यवहारासाठी QR कोड आणि UPI पेमेंट सुरु करणे.
  • स्टेप 4: UPI डिटेल्स NPCI कडे पाठवली जाते.
  • स्टेप 5: त्यानंतर डिजिटल व्यवहारासाठीचे रु. १ प्रोत्साहन अनुदान जमा होईल.
  • स्टेप 6: वरील प्रोसेस सोबतच लाभार्थीचे प्रमाणपत्र व ओळख पत्र मिळेल.
  • स्टेप 7: लाभार्थीची माहिती प्रशिक्षणासाठी MSDE कडे पाठवली जाईल.
  • स्टेप 8: ५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणार.
  • स्टेप 9:  रु. १५,०००/- टूल बॉक्स साठी अनुदान मिळेल.
  • स्टेप 10: रु. १ लाखाच्या कर्जासाठी माहिती बँकेकडे पाठवली जाईल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *