कर्ज (Loans)व्यवसाय (Business)

स्ट्रीट व्हेंडर ला ५० हजार विनातारण कर्ज । PM SVANidhi loan information in Marathi

विविध शहरांमध्ये रस्त्यावरील विक्रेते त्या शहरच्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेमधील फार महत्वाचे घटक असतात. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू तेही अगदी स्वस्तात उपलब्ध करण्यात यांचे योगदान असते. याच विक्रेत्यांना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखतात जसे कि गाडीवाले, ठेलेवाले, भाजीवाले, फूड स्टॉल, व अश्याच किरकोळ वस्तू विकणारे.त्यासोबतच सलून वाले, लाँड्रीवाले, चांभार, पान शॉप इ. या सर्वांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पीएम स्वनिधी हि योजना (PM Street Vendor’s AtmaNirbhar Nidhi) केंद्र सरकार बँकाच्या मार्फत राबवत आहे या योजनेबद्दल सविस्तर माहिती तीही मराठी मध्ये आपण पुढील लेखात पाहुयात (PM SVANidhi loan information in Marathi)

पी एम स्वनिधि योजनेची उद्दिष्ट्ये (Objective of  PM SVANidhi loan in Marathi)

Table of Contents

  1. खेळत्या भांडवलासाठी तीन टप्प्यात कर्ज पुरवठा करणे, पहिल्या टप्प्यात रु. १०,०००/- दुसऱ्या टप्प्यात रु.. २०,०००/- आणि तिसऱ्या टप्प्यात रु. ५०,०००/-.
  2. वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर व्याज परतावा.
  3. डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहनपर इन्सेन्टिव्ह.
  4. रस्त्यावरील विक्रेत्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे.

पात्रता व लाभार्थींची निवड (Eligibility and Selection Criteria of PM SVANidhi loan in Marathi)

  • नगरपालिका किंवा महानगरपालिकेने दिलेले विक्रेता प्रमाणपत्र (Certificate of Vending) व विक्रेता ओळखपत्र (Identity Card) असणारे या योजनेअंतर्गत पात्र असतील.
  • ज्यांच्याकडे विक्रेता प्रमाणपत्र (Certificate of Vending) व विक्रेता ओळखपत्र (Identity Card) नसेल परंतु नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या विक्रेता सर्व्हेमध्ये नोंद असेल तेही पात्र असतील परंतु प्रमाणपत्र आल्यावर त्यांनी ते जमा करावे.
  • नगरपालिका किंवा महानगरपालिका लवकरात लवकर सर्वे झालेल्या सर्वांना विक्रेता प्रमाणपत्र (Certificate of Vending) व विक्रेता ओळखपत्र (Identity Card) देणार आहे.
  • सर्व्हेमध्ये राहून गेलेल्या पण जे रस्त्यावर विक्री करत आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने LOR (Letter of Recommandation) मिळेल.
  • जर अजून पर्यंत कोणी विक्रेत्यांनी नोंदणी केली नसेल तर ते आपल्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेत नोंद करू शकतात.

पात्र व्यवसाय (Eligible Street Business for PM SVANidhi loan in Marathi)

भाजीविक्रेते, फळविक्रेते, स्ट्रीटफूड स्टॉल, होजिअरी विक्रेते, सलून दुकान, पान शॉप, छोटे टेलर, लॉन्ड्रीवाले हे व असेच रस्त्यावर व्यवसाय करणारे इतर सर्व विक्रेते या योजनेस (pm svanidhi yojana) पात्र असतील. अश्याच नवनवीन स्ट्रीट व्यवसायाची माहितीसाठी येथे क्लिक करा.

कर्ज रक्कम (Loan Amount under pm svanidhi yojana)

pm svanidhi या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात कर्ज वाटप होणार आहे.

  • पहिला टप्पा : रु. १०,०००/- (pm svanidhi 10000 loan)
  • दुसरा टप्पा : रु. २०,०००/- (pm svanidhi 20000 loan)
  • तिसरा टप्पा : रु. ५०,०००/- (pm svanidhi loan 50,000)

व्याज दर (Rate of Interest for pm swanidhi)

सर्व बँका या योजनेअंतर्गत (pm svanidhi scheme) कमीतकमी व्याज दर आकारणार आहेत म्हणजेच त्या त्या बँकेत व्यवसाय कर्जासाठी असणारा कमीत कमी व्याज दर जो कि बहुतेक सर्व बँकात ८ ते १० टक्क्यांच्या आसपास असतो.

व्याज परतावा (Interest Subsidy for PM SVANidhi loan)

pm swanidhi scheme या योजनेअंतर्गत शासन आपल्याला ७% व्याज परतावा देणार आहे त्यामुळे आपल्याला अगदी नगण्य व्याजामध्ये हे कर्ज मिळणार आहे. हे व्याज आपल्या आधार लिंक असलेल्या खात्यात थेट जमा होणार आहे.

परतफेड कालावधी (Repayment Period for PM SVANidhi loan)

या योजनेत तीन टप्पांसाठी वेवेगळा परतफेड कालावधी आहे.

  • पहिल्या टप्प्यासाठी : १२ महिने
  • दुसऱ्या टप्प्यासाठी : १८ महिने
  • तिसऱ्या टप्प्यासाठी : ३६ महिने

डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन (Incentive for Digital Transaction to Street Vendors)

या योजनेअंतर्गत डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्यासाठी UPI ID असणे बंधनकारक आहे त्यासाठी आपण कोणत्याही UPI ID वापरू शकता जसे की BHIM, PhonePe, GooglePay. डिजिटल व्यवहारासाठी महिन्याला रु १००/- चा कॅशबॅक सुद्धा आहे.

कर्ज देणाऱ्या बँका (PM SVANidhi loan available in all banks)

हि योजना सर्व बँकात कार्यान्वित करण्यात आलेली आहे जसे कि सरकारी बँक, ग्रामीण बँका, स्मॉल फायनान्स बँका, कॉपरेटिव्ह बँका, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन्स इ

क्रेडिट गॅरंटी (Credit Guarantee)

या योजनेखालील कर्ज हे CGTMSE योजनेखाली सुरक्षित केलेले असलेने आपल्याला कोणतेही इतर तारण बँकेला देण्याची गरज नाही.

अर्जकसाकरावा (Process of pm swanidhi loan apply online and its information in Marathi)

  1. सर्वात प्रथम आपल्या जवळच्या नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत जाऊन विक्रेता प्रमाण पत्र व विक्रेता ओळख पत्र काढून घ्यावे.
  2. किंवा नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा सर्वे मध्ये विक्रेता म्हणून नोंद करावी.
  3. जवळच्या महा ई सेवाकेंद्रात किंवा बँक bc कडून ऑनलाईन अर्ज भरू शकता, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट ऑफ व्हेंडिंग आणि LOR ऑनलाईन फॉर्म भरताना काढता येते.
  4. ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरावी व त्याची प्रिंट काढावी.
  5. फॉर्म भरताना UPI ID न चुकता भरावा.
  6. सादर प्रिंटेड फॉर्म बँकेत जमा करावा त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर, सर्टिफिकेट ऑफ व्हेंडिंग, विक्रेता ओळख पत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो.

खालील फ्लोचार्ट मध्ये अर्ज कसा करावा याचे प्रत्येक टप्प्याचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत. (Flow Chart of Loan Application of pm svanidhi yojana in Marathi)

स्टेप१: https://pmsvanidhi.mohua.gov.in/ हे PM SVANidhi loan वेब पोर्टल ओपन करा

pm svanidhi loan information in marathi

स्टेप२: आपला मोबाइल नंबर टाका व “I am not a robot ” ला क्लिक करा त्यानंतर request OTP ला क्लिक करा.

Enter Mobile Number

Request OTP

स्टेप ३: आपल्याला आलेला OTP टाका व verify OTP ला क्लिक करा.

pm svanidhi scheme Verify OTP

स्टेप ४: तुमच्याकडे आधार आहे का? योग्य पर्याय निवडा.

pm svanidhi loan

स्टेप५: दिलेल्या विक्रेत्यांच्या कॅटॅगरीतून योग्य कॅटेगरी निवडा

Street Vendor Category

वरील तीनही कॅटेगरीसाठी पुढील प्रक्रिया वेगवेगळी आहे त्याची संपूर्ण माहिती कॅटेगरी नुसार pdf स्वरूपात खालील लिंक दिलेली आहे ती आपण डाउनलोड करून वाचू शकता.

LOR काढायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वरून काढू शकता.

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *