मॉर्टगेज लोन (Mortgage Loan) समजून घ्या अगदी सोप्प्या भाषेत
Mortgage loan in Marathi
माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) ला मालमत्तेवर कर्ज, तारण कर्ज किंवा Loan Against Property (LAP) सुध्दा म्हणतात. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) आपल्याकडील मालमत्ता तारण ठेवून दिले जाते, सदर मालमत्ता कर्जाची परतफेड होईपर्यंत बॅंकेकडे तारण राहते. माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) साठी तारण म्हणून निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्ता स्विकारली जाते.
मालमत्ता कर्जाचा व्याजदर विविध बॅंकांमध्ये थोड्याफार फरकाने कमी अधिक असू शकतो तरीही सध्या माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) चे व्याज दर 8% -10% च्या दरम्यान आहेत, व्यावसायिक उद्देशासाठी लागणार्या माॅर्टगेज लोनचा व्याज दर वैयक्तिक वापराच्या व्याजदरापेक्षा कमी असतो. बॅंका सामान्यतः मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या 50% ते 70% च्या दरम्यान तारण कर्ज मंजूर करतात, ज्याची तुम्ही 10-20 वर्षांपर्यंतच्या EMI मध्ये सहज परतफेड करू शकता.
गृह कर्जाप्रमाणे हे कर्ज देताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे इस्टीमेट, कोटेशन, बील्स द्यावी लागत नाहीत. पगारदार आणि स्वयंरोजगार करणारे (Self Employed and MSME) अशा दोन्ही कर्जदारांसाठी त्यांची मालमत्ता गहाण ठेवून त्यांचा व्यवसाय आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी माॅर्टगेज लोन दिले जाते.
कर्ज घेण्याचा उद्देश (Purpose of Mortgage Loan in Marathi)
Table of Contents
काही मूळ उद्देश ज्यासाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता ते म्हणजे व्यवसायाचा विस्तार करणे, मालमत्ता खरेदी करणे, शिक्षणाच्या गरजा, लग्न इ. हे कर्ज निवासी/व्यावसायिक/औद्योगिक मालमत्तेच्या तारणावर दिले जाते. कर्जदार म्हणून तुम्हाला कर्जाचा अंतिम वापर त्याच्या अर्जामध्ये घोषित करणे आवश्यक आहे कारण जर आपण याचा व्यवसायामध्ये वापर करणार असाल तर आपल्याला व्याजदरात सवलत मिळते. Mortgage loan in Marathi.
माॅर्टगेज लोन Mortgage Loan / Loan Against Property कर्जाचे फायदे (Mortgage loan Explained in Marathi)
आपल्या गरजेनुसार वेगवेगळे असू शकतात. तरीही, काही सामान्य तारण कर्ज लाभ खालीलप्रमाणे आहेत :
- सोयीनुसार वापर: वैयक्तिक कर्जाप्रमाणे, मालमत्तेवरील कर्ज कोणत्याही वैयक्तिक आणि व्यावसायिक हेतूंसाठी वापरले जाऊ शकते.
- मोठ्या रकमेचे कर्ज: आपण तारण देत असलेल्या मालमत्तेच्या बाजारमूल्यच्या प्रमाणात आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला कर्ज मिळू शकते, यामुळे नक्कीच आपले एखादे मोठे काम होऊ शकते.
- कमी व्याजदर: सुरक्षित कर्जावरील व्याजदर असुरक्षित कर्जावरील व्याजदरापेक्षा कमी असतो. यामुळे मालमत्तेवरील कर्ज हे वैयक्तिक कर्जासाठी स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे.
- सोयीनुसार कालावधी: मालमत्तेवरील कर्जाचा कालावधी साधारणपणे 10-20 वर्षांपर्यंत वाढतो, ज्यामुळे तुम्हाला कमी EMI चा लाभ मिळतो आणि परतफेडीची अधिक लवचिकता मिळते. तसेच आपण वेळेपूर्वीच आपल्या कर्जाची परतफेड करू शकतो.
- हस्तांतरण (Takeover) सुविधा: तारण कर्ज देखील आपण दुसऱ्या बॅंकेकडे हस्तांतरित (Takeover) करू शकता, परंतु जर व्याज दरात चांगल्या प्रमाणात सुट मिळत असेल तरच आपण दुसरीकडे हस्तांतरित करावे कारण दुसर्या बॅंकेत गेल्यावर आपल्याला परत त्यासाठी मालमत्तेचे माॅर्टगेज करावे लागेल आणि त्यासाठी येणारा खर्चही भरपूर असतो.
आवर्जून लक्षात घेण्यासारखे
माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) च्या तुलनेत गृहकर्जाच्या अंतर्गत गृहबांधणी किंवा खरेदीसाठी कर्ज कमी व्याजदरावर उपलब्ध आहे. गृह कर्जाप्रमाणे माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) वर आपण आयकर परतावा मिळवू शकत नाही. मालमत्तेवरील कर्जे व्यवसाय विस्तार, शिक्षण, वैद्यकीय खर्च इत्यादी कारणांसाठी वापरली जाऊ शकतात. Mortgage loan in Marathi
माॅर्टगेज लोन (Mortgage Loan) घेण्यासाठी पात्रता Loan against Property eligibility
मानक Parameters | पात्रता Eligibility Criteria |
---|---|
कमीत कमी वय | किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे असलेल्या व्यक्ती (75 वर्ष वयापर्यंत परतफेड कालावधी ठेवता येतो) |
कर्ज कालावधी | बँका तुमच्या वयानुसार १५ वर्षांपर्यंत कर्ज देतात (टीप: तथापि, काही बँका मालमत्तेवर 7 वर्ष किंवा 9 वर्षांपेक्षा जास्त काळ कर्ज देऊ शकत नाहीत. फक्त निवडक बँका 15 किंवा 20 वर्षांपर्यंत तारण कर्ज देतात.) |
निव्वळ मासिक उत्पन्न | बँका पगारदार व्यक्तींसाठी किमान उत्पन्न ₹ 40,000 आणि स्वयंरोजगारासाठी ₹ 3 लाख p.a पसंत करतात. ज्या प्रकरणांमध्ये उत्पन्न ₹ 40,000 पेक्षा जास्त आहे, बँका कमाल 65% पर्यंत कर्ज देतात |
तारण मालमत्तेच्या प्रमाणात कर्ज Loan to Value | बँका सामान्यतः 60-70% च्या LTV साठी तारण कर्ज देतात. LTV प्रमाण मालमत्तेच्या प्रकारानुसार भिन्न आहे. निवासी मालमत्तेवर घेतलेल्या कर्जासाठी LTV प्रमाण सर्वाधिक आहे, तर व्यावसायिक मालमत्तेवरील कर्जासाठी LTV प्रमाण सर्वात कमी आहे. • औद्योगिक मालमत्तेसाठी – 50 – 55% • निवासी मालमत्तेसाठी – 60 – 75% • व्यावसायिक मालमत्तेसाठी – 60 – 70% |
CIBIL Score for Mortgage Loan | बँका बाजार मूल्य किंवा मालमत्तेचे नोंदणीकृत मूल्य यापैकी जे कमी असेल त्यावर आधारित कर्ज देतात. बँक 650 आणि त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर गहाण कर्जासाठी पात्र मानतात. (टीप: कमी CIBIL स्कोअरच्या बाबतीत, तुम्ही उच्च व्याज दर आणि उच्च मार्जिन यासारख्या काही अतिरिक्त अटींसह काही बँका कर्ज देऊ शकतात. |
Mortgage loan process in 5 Simple Steps
कमी कमी व्याजदरात तारण कर्ज कसे मिळवावे? How to get a mortgage loan at a low interest rate?
आपल्या बँकेकडून कमीत कमी व्याजदारचे आणि पारदर्शकरित्या मालमत्ता कर्ज मिळविण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करू शकता. You can use the following method to get a low interest and transparent property loan from your bank. Mortgage loan in Marathi
स्टेप 1 : कर्जाची पात्रता आणि EMI तपासा
तुम्ही ज्या कर्जासाठी अर्ज करत आहात ते कर्ज घेण्यासाठी लागणारी पात्रता तपसा (या पात्रतेसभंधी लागणारी सर्वसाधारण आवश्यक माहिती आपल्याला बँकेच्या वेबसाइट वर किंवा बँकेच्या शाखेमध्ये मिळू शकते). यावरून आपण मिळणार्या कर्जाची अंदाजे रक्कम काढू शकता तसेच, तुमच्या वर्तमान निव्वळ उत्पन्न आणि आर्थिक क्षमतेच्या आधारे तुम्ही सहजपणे परतफेड करू शकणार्या मासिक EMI ची गणना करू शकता. त्याचप्रमाणे, तुमचे वय, निव्वळ उत्पन्न, विद्यमान दायित्वे, मालमत्तेचा प्रकार, LTV प्रमाण आणि इतर घटकांवर आधारित तुमची कर्जाची पात्रता तपासा. Mortgage loan in Marathi.
स्टेप 2 : मालमत्तेच्या विविध मंजुर्या आणि कायदेशीर कागदपत्रे तपासा
ज्या मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे त्या मालमत्तेचे क्लीन टायटल, सर्व वैधानिक आणि सरकारी मान्यता, बांधकाम परवाने, मंजूर नकाशा, पूर्णत्वाचा दाखला तसेच मालमत्तेच्या कागदपत्रांचा संपूर्ण संच असणे आवश्यक आहे. म्हणून, मालमत्तेवर कर्ज घेण्यासाठी सर्व रेकॉर्ड आणि स्वच्छ शीर्षक असलेली मालमत्ता निवडा. तसेच निवासी मालमत्तेवरील कर्ज कमी व्याजदरासह मिळणे सोपे आहे आणि या कर्जाच्या पर्यायासाठी मालमत्तेची पहिली पसंती असावी.
स्टेप 3 : वेगवेगळ्या बँकेच्या व्याजदारची तुलना करा (Mortgage loan interest rate)
एकदा तुम्हाला तुमची पात्रता आणि तुम्ही ज्या मालमत्तेसाठी कर्ज घेऊ शकता याची जाणीव झाल्यावर, तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या विविध तारण कर्ज व त्यांच्या व्याजदारांची तुलना करू शकता.
a) निश्चित (फिक्स्ड) आणि फ्लोटिंग दरांमधील निवड. Fixed Rate of Interest or Floating Rate of Interest
स्थिर (फिक्स्ड) दर फ्लोटिंग रेट कर्जाच्या तुलनेत किंचित जास्त व्याज दराने येतात आणि मालमत्ता कर्जाच्या कालावधीत व्याज दर स्थिर राहतो. फ्लोटिंग रेट कर्जामध्ये, रेपो दरासारख्या बाह्य बेंचमार्क दरांमधील बदलांना प्रतिसाद म्हणून नियतकालिक अंतराने व्याजदर रीसेट केले जातात. आज भारतातील मालमत्तेवरील बहुतांश कर्जे फ्लोटिंग रेट लोन आहेत कारण ते LAP वरील व्याजदर सध्याच्या व्याजदरांनुसार बदलू देतात. बहुतांश लोक या प्रकारचा व्याज दर स्विकारतात.
b) ओव्हरड्राफ्ट सुविधा Overdraft Facility
तुम्ही प्रॉपर्टी लोनसह ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या पर्यायाचा देखील विचार करू शकता. ओव्हरड्राफ्ट सुविधा तुम्हाला तुमच्या कर्जामध्ये मालमत्ता ओव्हरड्राफ्ट खात्यावर अतिरिक्त रक्कम जमा करण्याची परवानगी देते. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या एकूण व्याजाची रक्कम वाचवू शकता. या कर्जाची शिफारस स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांना केली जाते ज्यांच्याकडे सामान्यत: अतिरिक्त रोकड असते. ओव्हरड्राफ्ट कर्जावरील व्याजदर नियमित तारण कर्जाच्या व्याजदरापेक्षा किंचित जास्त असतात
स्टेप 4 : शॉर्टलिस्ट केलेल्या बँकांचे इतर शुल्क आणि कर्ज मापदंडांची तुलना करा
बँका LAP व्याजदरांव्यतिरिक्त मालमत्ता कर्जावर इतर अतिरिक्त शुल्क देखील आकारतात, त्यामुळे तुम्हाला मालमत्तेवरील कर्जासह सर्व अतिरिक्त शुल्क आणि शुल्क माहित असले पाहिजे ज्यात प्रीपेमेंट शुल्क, प्रक्रिया शुल्क, विमा प्रीमियम आणि शॉर्टलिस्ट केलेल्या बँकांनी लागू केलेले इतर शुल्क समाविष्ट आहे.
स्टेप 5 : बॅंक निवडताना बॅंकेत मिळणार्या इतर सोयी सुविधांचा सुध्दा विचार करावा.
जेव्हा तुम्ही कर्ज घेण्याचा निर्णय घ्याल तेव्हा तुम्ही इतर सेवा आणि पारदर्शकतेशी संबंधित मापदंडांची देखील काळजी घेतली पाहिजे. यातील काही घटक म्हणजे टर्नअराउंड टाईम (TAT) कर्जमंजूरीसाठी लागणारा वेळ, घरपोच सेवा आणि कर्ज प्रक्रियेतील पारदर्शकता. तुम्हाला ठराविक कालावधीत रेपो दरातील ट्रेंड आणि बदल देखील समजून घेणे आवश्यक आहे.
कोणतेही कर्ज रीजेक्ट व्हायचे ३ प्रमुख कारणे असतात. महितीसाठी क्लिक करा.
माॅर्टगेज लोन (तारण कर्ज) व गृहकर्जामधील फरक What is the difference between home loan and Mortgage Loan?
Home Loan गृह कर्ज | Mortgage Loan तारण कर्ज |
होम लोन घर बांधण्यासाठी किवा रहिवाशी मालमत्ता विकत घेण्यासाठी दिले जाते. | तारण कर्ज आपण कोणत्याही कारणासाठी वापरू शकता. |
गृह कर्जा मध्ये आपण घर बांधण्यासाठी जागा घेऊ शकता व त्यावर घर बांधू शकता. | तारण कर्जा मध्ये आपल्याला आपल्याकडे असलेली रहिवाशी, व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्ता तारण देऊन कर्ज मिळते |
तारण कर्जाच्या प्रमाणात गृह कर्जाचे व्याजदर कमी असतात. सध्या गृहकर्जाचे व्याज दर 6.40% पासून सुरू होतात. | तारणकर्जाचे व्याजदर तुलनेने जास्त असतात, सध्या 8% ते 8.50% पासून तारण कर्जाचे व्याजदर सुरू होतात. |
गृहकर्जाच्या व्याजवर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते | तारण कर्जाच्या व्याजावर आपल्याला इन्कम टॅक्स वर कोणत्याही प्रकारची सूट मिळत नाही. |
गृह कर्जामध्ये परतफेडीचा कालावधी 30 वर्षापर्यंत मिळतो | तारणकर्जामध्ये जास्तीत जास्त 15 वर्षापर्यंत परतफेडीचा कालावधी मिळू शकतो |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
1. मालमत्तेवरील कर्ज कशासाठी वापरले जाऊ शकते?
निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तेवरील कोणतेही कर्ज वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही हेतूंसाठी वापरले जाऊ शकते. बँका सहसा आपल्याला कर्जाची रक्कम कुठे वापरणार याचा तपशील विचारत नाहीत. तरीही जर आपण ही रक्कम आपल्या उद्योगात व्यवसायात वापरणार असाल तर बँकेला नक्की सांगा कारण आपल्याला व्याजदरात सूट मिळू शकते.
2. मला मालमत्तेवर कर्ज म्हणून मिळू शकणारी रक्कम कर्ज देणारी बँक कशी ठरवते?
मुळात, बँक तुमची परतफेड करण्याची क्षमता पाहते. कर्जाच्या रकमेची गणना करण्यासाठी, तुमचे उत्पन्न, वय, पात्रता, सहकर्जदार घेणार असाल तर त्यांचे उत्पन्न, मालमत्ता, दायित्वे, स्थिरता आणि व्यवसायाची सातत्य आणि बचतीचा इतिहास विचारात घेतला जातो. तथापि, कर्जाची पात्रता, साधारणपणे, मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त नसते.
3. मालमत्तेवर कर्जासाठी सह-अर्जदार असू शकतो का? होय असल्यास, सह-अर्जदार कोण असू शकते?
तुम्ही तुमच्या पती किवा पत्नीस सह-अर्जदार म्हणून घेऊ शकता आणि त्यांचेही उत्पन्न गृहीत धरल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कर्ज मिळू शकते. तथापि, मालमत्ता सह-मालकीची असल्यास, सर्व सह-मालक अनिवार्यपणे सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. तसेच आपल्या कर्जा मध्ये असणारे सर्व कर्जदार रक्ताच्या नात्यातील असावे.
4. अशा कर्जासाठी प्रक्रिया शुल्क काय आहे?
कोणत्याही मालमत्तेवर कर्जासाठी प्रक्रिया शुल्क बँकेनुसार बदलते आणि साधारणपणे 1 ते 1.5 टक्के असते.
5. मालमत्तेवरील कर्जावरील व्याज दराची गणना कशी केली जाते?
व्याजाची गणना रोजच्या रिड्युसिंग बॅलन्सवर केली जाते. हे व्याज आपल्या EMI मध्ये अॅडजस्ट केलेले असते त्यामुळे डेबिट होणारे व्याज आपल्याकडून वेगळे वसूल केले जात नाही.
6. कर्जाचा कालावधी किती आहे?
मालमत्तेवरील कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 15 वर्षांचा असतो, अटीच्या अधीन राहून ते तुमचे निवृत्तीचे वय ओलांडू शकत नाही. व्यवसायिकांच्या संदर्भात या कर्जाचा कालावधी वाढू शकतो.
7. माझे कर्ज कसे फेडायचे?
तुम्ही कर्जाची परतफेड मुद्दल आणि व्याजासह समान मासिक हप्त्यांमध्ये (EMIs) करता. जर आपल्याला कर्ज मुदतपुर्व फेडायचे असेल तर आपण परतफेड करू शकता.
8. मला तारण म्हणून काय द्यावे लागेल?
या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची मालमत्ता गहाण ठेवावी लागेल. हे तारण आपण Equitable Mortgage किवा Simple Mortgage करून देऊ शकता. विमा पॉलिसी किंवा अशा इतर कोणत्याही असाइन करण्यायोग्य आर्थिक साधनांची आपण सुरक्षा म्हणून बँकेला देऊ शकता. कृपया मालमत्तेचे शीर्षक स्पष्ट, विक्रीयोग्य आणि भारमुक्त असल्याची खात्री करा. अशा मालमत्तेवर कुठल्याही कोर्टात खटला प्रलंबित असू नये.
9. मी शेड्यूलच्या आधी कर्जाची परतफेड करू शकतो का?
होय. प्रीपेमेंट शक्य आहे आणि जर तुम्ही कर्ज हस्तांतरित न करता तुमच्या स्वतःच्या निधीच्या स्रोतातून पैसे भरले तर कर्जाचा लाभ घेतल्यानंतर सहा महिन्यांनी कर्जाची परतफेड केल्यास कोणतेही पूर्वपेमेंट शुल्क नाही.
Pingback: NPA Loan Recovery Process in India
Pingback: Difference between Equitable Mortgage and Registered Mortgage
Pingback: Best Investment Plans for the Middle Class - Detailed in Marathi