विमा (Insurance)

थर्ड पार्टी इन्शुरन्स करत असाल तर सावधान ! (Comprehensive or Third Party Insurance in Marathi)

Most important Diffrences in Comprehensive or Third Party Insurance

या आर्टिकल मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण कुठलीही गाडी वापरत असाल तर त्या गाडीचा विमा उतरवणे बंधनकारक आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार Vehicle Insurance करणे गरजेचे आहे पण जेव्हा Vehicle Insurance करण्याची वेळ येते तेव्हा सर्वांना एकच प्रश्न पडतो कि Comprehensive or Third Party Insurance. Which is better comprehensive or third-party insurance for two wheeler?

ड्रायविंग लायसन आणि रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जसे महत्वाचे आहे तसेच Car Insurance पण महत्वाचा आहे, त्यामुळे Insurance Renewal ची तारीख लक्षात ठेवा आणि तारीख संपायच्या आत कार इन्शुरन्स रिन्यूअल करून घ्या. जर आपली गाडी पोलिसांनी कधी अडवली आणि आपल्याकडे Valid Insurance Policy नसेल तर आपल्याला चांगलाच दंड लागू शकतो.

शासननिर्णयानुसार आपण किमान आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी केला पाहिजे तरीही बहुतेक लोक इन्शुरन्स नसलेल्या गाड्या रस्त्यावर पळवत असतात. त्यामुळेच सरकार अशा नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करत असते. सामान्य जनता इन्शुरन्स करणे टाळत असते म्हणूनच सरकारच्या नियमांनुसार कमीत कमी Third Party Insurance करणे गरजेचे आहे. आता सरकारने सांगितले आहे की कमीत कमी Third Party Insurance तरी करा पण सामान्य जनता काय करते तर फक्त Third Party Insurance करते, Comprehensive Insurance चे इतके फायदे असताना वाहन मालक आता फक्त Third Party Insurance करतात.

समजा एका व्यक्तीने थर्ड पार्टी इन्शुरन्स केला असेल आणि जर त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि त्या अपघातमध्ये त्याच्या गाडीचे नुकसान झाले तसेच समोरच्या एखाद्या व्यकितीचे सुद्धा नुकसान झाले तर या थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये फक्त समोरच्या व्यक्तीचे झालेले नुकसान फक्त या थर्ड पार्टी इन्शुरन्स मधून भागवले जाते. या व्यक्तिला स्वतःची गाडी दुरुस्त करण्याचा खर्च त्याला स्वताला करावा लागेल.

याउलट जर या व्यक्तीने कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स केला असता तर त्याला स्वतची गाडी दुरुस्त करण्याचा खर्च सुद्धा क्लेम करता आला असता.

वरील प्रसंग लक्षात घेऊन आपण Comprehensive Car Insurance व Third-Party Car Insurance ची विस्तृत माहिती घेऊया 

What is Third Party Car Insurance? थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय ?

भारतामध्ये जर आपल्याला गाडी चालवायची असेल तर आपल्या गाडीचा कमीत कमी हा इन्शुरन्स करणे बंधनकारक आहे. Third party insurance मध्ये आपल्या गाडीमुळे समोरच्याचे झालेलं नुकसान भरपाई करून दिले जाते. समजा आपल्या गाडीने समोरच्या गाडीचे नुकसान केले तर ती गाडी दुरुस्त करण्याचा खर्च आपल्या या इन्शुरन्स मधून दिला जातो. तसेच आपल्या गाडीमुळे एखाद्याला शारीरिक इजा झाली तर त्याचा दवाखान्याचा खर्च सुद्धा या इन्शुरन्स मधून दिला जातो.

What is Comprehensive Car Insurance? कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणजे काय ?

Comprehensive Car Insurance हा Third Party Insurance पेक्षा जास्त फायदेशीर असतो. यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या नुकसान भरपाई सहीत आपल्याला आपली गाडी दुरूस्त करायचा खर्चही मिळतो. 

जास्त करून आपल्या गाडीला छोटे मोठे अपघात होत असतात ज्यात गाडीचे खूप नुकसान होत असते, जसे कि दुसरी गाडी बाजूने गाडीला घासणे, पार्किंग मध्ये गाडी पार्क करताना अशा विविध छोट्या कारणामुळे नुकसान होत असते. आपण आपल्या गाडीचा Comprehensive Insurance केला असेल तर अशा छोट्या कारणामुळे झालेले नुकसान Insurance मध्ये कव्हर होते.

Comprehensive Car Insurance vs Third-Party Car Insurance

आपल्याला Comprehensive Insurance or Third Party Insurance मध्ये प्रामुख्याने कोणते फरक आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील मुद्यांचा विचार करावा लागेल ज्यामध्ये आपल्याला या इन्शुरन्स मधील फरक लक्षात येईल. आणि आपल्याला इन्शुरन्स खरेदी करताना याचा नक्कीच उपयोग होईल.

Insurance Coverage

Comprehensive insurance मध्ये विविध प्रकारच्या घटना कव्हर केलेल्या असतात जसे कि चोरी, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, अपघात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना. मध्ये विविध प्रकारच्या घटना कव्हर केलेल्या असतात जसे कि चोरी, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, अपघात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनामध्ये आपल्या गाडीचे नुकसान तसेच समोरील व्यक्तीचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई सुद्धा Comprehensive insurance मध्ये कव्हर होते. याउलट  Third party insurance इन्शुरन्स मध्ये फक्त समोरच्या व्यक्तीचे झालेले नुकसान यामध्ये कव्हर होत असते.

Prices

Third party car insurance चे प्रीमियम दर Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) हि इन्शुरन्स नियामक संस्था ठरवत असते आणि Comprehensive insurance चे प्रीमियम दर आपण ज्या वाहनाचा विमा करणार आहेत, त्याची किंमत किती, किती सीसी चे इंजिन आहे तसेच आपण गाडी कोठे वापरणार आहेत त्यावर अवलंबून असते.

Compulsory Insurance

सर्वात महत्वाचे म्हणजे Comprehensive Insurance करणे आपल्याला बिलकुल बंधनकारक नाही परंतु आपल्याला आपल्या गाडीचा किमान Third Party Car Insurance तरी करावाच लागेल जो कि कंपलसरी आहे. आणि आपल्याला Comprehensive Insurance चे फायदे माहित असूनही जर आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स करणार असाल तर नक्कीच आपल्याकडे भरपूर पैसे असतील आपली गाडी दुरुस्त करण्यासाठी. Third party insurance enough for bike for police verification.

Why Should You Buy Comprehensive Insurance?

वरील मुद्दे वाचून आपल्याला कळालेच असेल कि कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स हा थर्ड पार्टी इन्शुरन्स पेक्षा किती फायदेशीर आहे पण अजूनही आपल्याला काही शंका असेल तर खाली काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत ज्यामुळे आपल्याला अधिक क्लियर होईल कि कोणता इन्शुरन्स आपल्याला फायदेशीर आहे.

Premium Rates

तुम्ही म्हणाल कि प्रीमियम रेट्स तर थर्ड पार्टी इन्शुरन्स चे खूप कमी असतात परंतु विविध घटनांच्या कव्हरेज चा विचार केला तर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स नेहमीच फायदेशीर असतो. कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स मध्ये आपल्याला नक्कीच Value For Money मिळेल.

Add On Coverage

आपण आपल्या कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन सोबत ऍड ऑन प्लॅन घेऊ शकता जसे कि ऍडिशनल कव्हरेज, तसेच आपल्याला नो क्लेम बोनस मिळून पुढील प्रीमियम दर कमी होतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये अशा प्रकारच्या ऍड ऑन सुविधा नसतात.

Risk

कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन मध्ये आपल्याला आपल्या कारसाठी नक्कीच जास्त रिस्क कव्हर मिळते. 

थोडक्यात महत्वाचे

कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स जरा महाग जरी वाटत असला तरी आपण कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स करायला हवा जेणेकरून जर दुर्दैवाने आपल्या गाडीचा अपघात झालाच तर आपली गाडी पूर्ण दुरुस्त करण्यासाठी गाडी दुरुस्तीची रक्कम आपल्याला क्लेम करता येईल. बहुतेक कंपन्या कॅशलेस क्लेम ची सुविधा सुद्धा देतात जेणेकरून आपल्याला गाडी दुरुस्त करण्यासाठी तात्काळ पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे यापुढे कधीही गाडीचा इन्शुरन्स करताना कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स करा जेणेकरून अपघातामुळे गाडी दुरुस्तीचा अधीकच भार आपल्यावर पडणार नाही. आपण जर बँकेकडून कर्ज घेऊन गाडी घेणार असाल तर आपल्याला कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स करणे अत्यन्त महत्वाचे आहे. आपण आपल्या गाडीसोबत आपल्या कर्जाचा सुद्धा इन्शुरन्स करू शकता. अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचू शकता, कर्जाचा विमा करणे खरंच गरजेचं आहे का ?

Reasons for Car Insurance Claims Rejection

आपण कोणताही इन्शुरन्स केला तरी काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, जसे कि इन्शुरन्स मध्ये कोण कोणते नियम व अटी आहेत, आपल्या इन्शुरन्स मध्ये कोण कोणते नुकसान कव्हर असतात. आता या पुढे आपण इन्शुरन्स संबंधी पुढील गोष्टी जाणून घेऊयात.

कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स च्या सर्व कंपनीच्या पोलिसी मध्ये खालील घटनांमध्ये झालेले नुकसान कव्हर असतात:

  • नैसर्गिक आप्पती जसे की पुर, वादळ, भूकंप.
  • अपघातामध्ये होणारे आपल्या गाडीचे नुकसान
  • अपघातामध्ये समोरच्या व्यक्तीचे झालेले गाडीचे व शारीरिक नुकसान.
  • वाहन चोरी.
  • गाडी पेट घेतल्यामुळे होणारे नुकसान.
  • अपघातामध्ये मृत्यू झाल्यास वारसाला नुकसान भरपाई मिळते. आता सरकारने प्रत्येक वाहन मालकाचा रु. १५ लाखांचा अपघात विमा करणे बंधनकारक केलेलं आहे. आपला रु. १५ लाखांचा अपघात विमा असेल तरच आपल्या गाडीची नोंदणी होऊ शकते.

अत्यंत महत्वाचे : जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतील तर प्रत्येक गाडी घेताना हा रु. १५ लाखांचा अपघात विमा करणे गरजेचे आहे का? आणि असेल तर त्या प्रत्येक इन्शुरन्स चा आपल्याला अधिकचे रु. १५ लाखांचा अपघात विमा कव्हर मिळणार का ?

उत्तर : आपण जर एकदा नवीन गाडी खरेदी करताना  हा रु. १५ लाखांचा अपघात विमा केलेला असेल तर आपलयाला दुसरी गाडी घेताना परत हा रु. १५ लाखांचा अपघात विमा करण्याची गरज नाही, आणि समजा आपण दुसरी गाडी घेताना हा इन्शुरन्स केला तरीही आपल्याला एकूण फक्त रु. १५ लाखांचेच अपघात विम्याचे कव्हर मिळेल, त्यामुळे जर आपला रु. १५ लाखांचा अपघात विमा पहिली गाडी घेताना केला असेल तर दुसरी गाडी घेताना इन्शुरन्स करताना हि गोष्ट लक्षात ठेवावी जेणेकरून यासाठी लागणार एक्सट्रा प्रीमियम वाचेल.

ग्राहक म्हणून आपल्याला एक गोष्ट माहित असली पाहिजे कि कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आपला इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होऊ शकतो:

1. आपला क्लेम खोटा आहे असे आढळून आल्यास

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे इन्शुरन्स आहे म्हणून आपण गाडीचे कुठलीही दुरुस्ती करून घेऊ शकता असे नाही तर अपघातामध्ये झालेले गाडीचे नुकसान दुरुस्त करण्यासाठी इन्शुरन्स असतो, परंतु बहुतेक वेळा इन्शुरन्स कंपन्यांना असे लक्षात आले आहे कि काही ग्राहक आपल्या गाडीचा एखादा पार्ट खराब झाला आणि तो बदलायचा असल्यास त्याचे स्वतःहून नुकसान करतात आणि नंतर इन्शुरन्स क्लैम करतात कि गाडीचे नुकसान अपघातामधये झाले आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अशा प्रकारे खोटे क्लेम करणे बेकायदेशीर आहे.

2. दारू पिऊन वाहन चालवणे

सर्वात महत्वाची गोष्ट दारू पिऊन गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे आणि यासाठी आपल्याला कारावासही होऊ शकतो, दारू पिऊन गाडी चालऊन आपण आपला स्वतःचा तसेच रस्त्यावरील निरपराध लोकांचा जीव धोक्यात घालत आहात. अशा प्रसंगामुळे झालेल्या कुठल्याही नुकसानी बद्दल आपल्याला इन्शुरन्स क्लेम मिळत नाही.

3. ड्रायविंग लायसन्स नसताना गाडी चालवणे

जर तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवानाच नाही आणि तरीही तुम्ही गाडी चालऊन अपघात झाल्यास अशा नुकसानीला इन्शुरन्स कंपनी भरपाई देत नाही.

4. गाडीमध्ये मॉडिफिकेशन करणे

आपण जेव्हा इन्शुरन्स करता तेव्हा आपल्या गाडीच्या स्पेसिफिकेशन नुसार इन्शुरन्स कंपनी आपल्या गाडीचा इन्शुरन्स करत असते पण आपण जर गाडीमध्ये नंतर कोणतेही मॉडिफिकेशन केले आणि त्यामुळे गाडीचे काही नुकसान झाले तर अशा घटनेमध्ये आपल्याला इन्शुरन्स क्लेम मिळत नाही. समजा आपल्याला आपल्या गाडीमध्ये काही मॉडिफिकेशन करायचे आहेत तर त्यासाठी आपण रितसर रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर (RTO) आणि इन्शुरन्स कंपनीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. आपल्याला परवानगी मिळूही शकते पण त्यासाठी आपल्याला जास्तीचा प्रीमियम भरावा लागेल.

5. आपल्या गाडीचे झालेले नुकसान कंपनीला कळवण्यास उशीर झाल्यास

आपला कोणताही इन्शुरन्स असुद्या, प्रत्येक इन्शुरन्स आणि इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सबमिट करण्याचा एक ठराविक कालावधी असतो म्हणजे काही ठराविक दिवसाच्या आत क्लेम बद्दलची माहिती कंपनीला सादर करावयाची असते. सर्वसाधारणपणे बहुतेक कंपन्यांचा क्लेम इन्स्टिमेशन द्यायचा कालावधी ३० दिवसांचा असतो. जर काही अपरिहार्य कारणामुळे क्लेम सबमिट सरण्यास उशीर झालाच तर हा क्लेम मान्य करायचा का नाही याबाबत संपूर्ण निर्णय कंपनीवर अवलंबून असतो.

6. इन्शुरन्स पॉलीसी मधील अटी व शर्तींचा भंग करणे

आपण गाडीचा इन्शुरन्स करताना इन्शुरन्स कंपनी आपल्या गाडीच्या प्रकारानुसार आपल्या गाडीचा इन्शुरन्स करत असते जसे कि पॅसेंजर कर, कमर्शील वाहन, ५ सीटर, ७ सीटर इत्यादी. समजा आपण जर पॅसेंजर गाडीचा वापर कमर्शिअल वापरासाठी म्हणजेच काही अवजड सामान वाहून नेण्यासाठी केला आणि आपल्या गाडीचे काही नुकसान झाले तर अशा परिस्थितीत आपल्याला इन्शुरन्स मधून नुकसान भरपाई मिळू शकत नाही.

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *