दुकानगाळा किंवा ऑफिस खरेदीसाठी लोन (Commercial Property Loan)
स्वतःच्या मालकीचा दुकान गाळा किंवा ऑफिस असणे हे कुठल्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला व्यवसायात उत्तुंग भरारी घेणे सोप्पे होते तसेच दुकान किंवा ऑफिसच्या भाड्याचा मोठ्ठा खर्च कमी होतो. आता आपणही आपल्या व्यवसायासाठी कमर्शिअल प्रॉपर्टी (Commercial Property) खरेदी करू इच्छत आहात का? तर आता आपल्याला वाट बघायची बिलकुल गरज नाही कारण आपण या लेखामध्ये बघणार आहोत आपल्या व्यवसायासाठी प्रॉपर्टी खरेदी कर्ज (Commercial Property Loan) कसे मिळवायचे त्यासाठी त्यासाठीची प्रोसेस काय आहे, व्याज दर, परतफेड कालावधी या सर्वांची आपण इत्यंभूत माहिती घेणार आहोत.
आपल्या मालकीचा दुकान गाळा किंवा ऑफिस असेल तर आपला व्यवसाय स्थिरस्थावर होण्यास आणि उत्तरोत्तर व्यवसायिक प्रगती होण्यास नक्कीच मदत होते. तुम्ही एक छोटे दुकानदार असा किंवा मोठे उद्योगपती असा आता प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नातील दुकानगाळा किंवा ऑफिस घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण आजच्या युगात यासाठी कमर्शिअल प्रॉपर्टी लोन (Commercial Property Loan) घेणे झाले आहे पहिल्यापेक्षा किती तरी सोप्पे.
कमर्शिअल प्रॉपर्टी कर्ज (Commercial Property Loan) घेऊन आपण आपला व्यवसाय वाढवू शकता, दुकानगाळा किंवा कार्यालयीन जागा किंवा गोडाउन मध्ये चांगली गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःयाच्या जागेत व्यवसाय पूरक सुविधा निर्माण करता येतील आणि महसूल वाढीस चालना देण्यासाठी आपण इतरही वेगवेगळ्या ठिकाणी आपले व्यवसाय सुरु करू शकता.
व्यवसायिक मालमत्ता कर्जामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कर्ज लॉन्ग टर्म (Commercial Property Loan is a Long Term Loan) साठी दिले जाते म्हणजेच याचा परतफेड कालावधी जास्त असतो. त्यामुळे प्रॉपर्टीची किंमत जास्त असली तरी परतफेड कालावधी जास्त असल्याने इंस्टॉलमेंट अमाऊंट त्या प्रमाणात कमी असते. आणि समाज याच मालमत्तेतील काही भाग आपण भाड्याने दिला तर आपल्याला इंस्टालमेंट भरणे नक्कीच सोयीचे होईल.
शिवाय, व्यवसायिक मालमत्ता कर्जे घेतल्यावर तुमचा टॅक्सही वाचू शकतो. आपल्या प्रॉपर्टी वर आपण दरवर्षी डिप्रिसिएशन क्लेम (Claim Depreciation on Asset) करू शकता त्यामुळे आपले नेट प्रॉफिट कमी दिसून आपल्याला कमी टॅक्स भरावा लागेल. तसेच प्रॉपर्टी वर होणार विविध खर्च जसे दुरुस्ती विविध बिल्स, महापालिका कर हे सर्व आपण आपल्या व्यवसायाच्या खर्चात दाखवू शकता.
Commercial Property Loan व्यवसायिक मालमत्ता कर्ज किंवा कमर्शिअल प्रॉपर्टी लोन किंवा दुकानगाळा (Shop Premises) ऑफिस (Office Space) खरेदी करण्यासाठीचे लोन आपण घ्यायचे ठरवले असेल तर त्यासाठी आपण त्यासाठीचे पात्रता निकष (Eligibility Criteria), आवश्यक कागदपत्रे (Required Documents) याबद्दल आधी समजून घेतले पाहिजे. म्हणूनच, जर आपण एक भारतीय उद्योजक असाल तर व्यवसायाच्या विस्तार आणि आर्थिक वाढीकडे झेप घेण्यास तयार असाल तर आजच व्यवसायिक मालमत्ता कर्ज घेण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेत अर्ज करा.
व्यवसायिक मालमत्ता कर्ज म्हणजे नेमके काय (What is Commercial Property Loan?)
Table of Contents
व्यवसायिक मालमत्ता कर्ज हा एक असा कर्जाचा प्रकार आहे ज्यामध्ये आपण आपल्या व्यवसायासाठी दुकानगाळा किंवा ऑफिस साठी मालमत्ता घेऊ शकता. या मालमत्तेचा आपल्या व्यवसायासाठी तर फायदा होतोच त्याउपर कालांतराने आपल्या या मालमत्तेचे दर भविष्यात वाढतच राहतील. आपण सध्या व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी आपल्याला किती भरमसाठ भाडे द्यावे लागते त्यातून पण आपल्याला सुटका मिळू शकते.
व्यवसायिक मालमत्ता कर्जाचे फायदे (Benefits of Commercial Property Loan)
मालकी आणि दीर्घकालीन गुंतवणूक (Ownership and Long Term Investment)
आपल्या व्यवसायासाठी जागा भाड्याने घेण्यापेक्षा आपण आपल्या व्यवसायिक जागेचे स्वतः मालक व्हा तसेच या जागेतील दीर्घकालीन गुंतवणूक पुढे चालून आपल्याला नक्कीच फायदेशीर होईल. इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा स्थावर मालमत्तेमधे केली गुंतवणूक कधीही फायदेशीरच असणार आहे.
व्यवसाय विस्तार (Expansion of Business)
व्यवसायिक मालमत्ता कर्ज (Commercial Property Loan) घेऊन आपण नवीन ठिकाणी एखादा दुकान गाळा घेऊन आपल्या दुकानाची नवीन शाखा सुरु करू शकता, आपल्या ऑफिस चे दुसरी ब्रँच उघडून आपला व्यवसायाचा विस्तार करू शकता आणि आपल्या व्यवसायामधून चांगले उत्पन्न वाढवू शकता.
मालमत्तेची वाढती किंमत आणि भाडे उत्पन्न (Growing Prices and Rent Income)
व्यवसायिक मालमत्ता किंमत हि रहिवासी मालमत्तेपेक्षा जास्त वेगाने वाढत असते तसेच त्यामधून मिळणारे भाडेही रहिवाशी जागेच्या भाड्यापेक्षा कधीही जास्तच असते. हीच रक्कम आपण आपल्या व्यवसायामध्ये गुंतवून चांगला नफा कमाऊ शकता.
टॅक्स मधून सूट (Tax Benefits)
आपण जर व्यवसायासाठी मालमत्ता घेत असाल तर इनकम टॅक्स च्या नियमानुसार आपण व्यवसायिक मालमत्तेवर डिप्रिसिएशन क्लेम करू शकता त्यामुळे हि रक्कम तुम्ही तुमच्या टॅक्सेबल इनकम मधून कमी केल्यास नक्कीच आपल्याला कमी टॅक्स भरावा लागेल.
पात्रता आणि कागदपत्रे (Eligibility and Documents Required for Commercial Property Loan)
व्यवसायिक मालमत्ता कर्ज किंवा दुकानगाळा खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहेत.
- आपल्या व्यवसाय प्रोप्रायटरशिप (Proprietorship), पार्टनरशिप (Partnership) किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असला पाहिजे.
- दुकानगाळा किंवा ऑफिस असलेल्या इमारत शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन बांधलेली असावी म्हणजेच मंजूर बांधकाम नकाशा (Approved Plan), बांधकाम परवाना (Building Permission).
- शासकीय योजनेतील असेल तर आपल्या नावावर allotment letter असावे.
- खरेदी करणार असलेल्या मालमत्तेचे अग्रीमेंट टू सेल (Agreement To Sale)
- मालमत्तेवर कोर्टात कुठलाही दावा प्रलंबित असू नये. (Encumbrance Free)
- आपल्या व्यवसायाचे आर्थिक कागदपत्रे जसे कि इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return), बॅलन्सशीट (Balance Sheet), अकाउंट स्टेटमेंट (Account Statement).
व्यवसायिक मालमत्ता कर्जामधील महत्वाचे मुद्दे (Key Points of Commercial Property Loan)
कर्ज अटी आणि व्याज दर:
व्यवसायिक मालमत्ता कर्जे विशिष्ट अटी व शर्तींसह येतात ज्यामध्ये परतफेड कालावधी, व्याज दर आणि प्रोसससिंग फीस इत्यादींची सखोल चौकशी आपण आपल्या बँकेकडे करायला हवी. या सोबतच विविध बँकामध्ये कर्जाचे व्याजदर कमी जास्त असू शकतात त्यामुळे आपण विविध बँकेतील व्याज दर व इतर अटीची तुलनात्मक अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
कर्ज-ते-मूल्य प्रमाण (Loan to Value Percentage LTV):
आपण कोणतेही कर्ज घेताना आपल्याला एकूण वस्तूची किंमत आहे ती संपूर्ण रक्कम कर्जाच्या स्वरूपात कधीही मिळत नसते. त्यामध्ये आपल्या स्वतःची गुंतवणूक (Margin Money) सुद्धा करावी लागते त्यालाच मार्जिन मनी (Margin Money) म्हणतात तसेच या लोन मध्ये सुद्धा आपण खरेदी करणार असलेल्या व्यवसायिक मालमत्तेची पूर्ण रक्कम आपल्याला कर्जस्वरूपात मिळणार नाही. सहसा आपल्या मालमत्तेचा एकूण रकमेचा ७५% ते ९०% पर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकते उरलेली रक्कम आपल्याला स्वतः भरावी लागते. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक बँकेत जेवढी कर्जाची रक्कम एकूण मालमत्तेच्या जास्त तेवढे व्याज दर जास्त, म्हणजेच आपण जर जास्त मार्जिन मनी भरायला तयार असाल तर नक्कीच आपल्याला व्य्वज दरामध्ये सूट मिळेल.
परतफेड पर्याय (Repayment Option)
व्यवसायिक मालमत्ता कर्ज मध्ये विविध परतफेडीचे पर्याय असतात परंतु बहुतेक बँक मासिक हप्त्यास प्राधान्य देतात, या कर्जासाठी ८४ महिन्यांपासून ते १२० महिन्यांपर्यंत परतफेड कालावधीचे पर्याय आहेत. आणि जर आपल्याला वेळेच्या आधीच आपले कर्ज भरायचे असल्यास आपण भरू शकता, आजकाल बहुतेक बँक प्री पेमेंट चार्जेस लावत नाहीत, तरीही आपण या संदर्भातील अटी शर्ती आपल्या मंजुरी पत्रामध्ये तपासू शकता.
विमा आवश्यकता (Insurance of Asset and Loans)
कुठलीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर त्याचा विमा (General Insurance of Assets) केलाच पाहिजे जेणेकरून भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून वाचता येईल. कर्ज न घेता खरेदी केलेल्या मालमत्तेचे स्वतःहून तर कोणीही विमा करायला जात नाही परंतु आपण जर एखादी मालमत्ता कर्ज घेऊन खरेदी करत असाल तर आपल्याला त्या मालमत्तेचा विमा करावाच लागेल.
त्यासोबतच आपण घेतलेल्या कर्जाचा विमा (Loan Insurance) करणे सुद्धा खूप फायदेशीर आहे जेणेकरून आपल्या नंतर आपल्या वारसदारांना या कर्जाचे हप्ते भरावे लागणार नाहीत आणि त्या विमाच्या रकमेतून उरलेले कर्ज फेडले जाईल.
पूर्व-मंजुरी प्रक्रिया (In Principal Sanction)
मालमत्ता घेण्यासाठी कर्ज घेणार असाल तर आपल्या बँकेपासून पूर्व मंजुरी पत्र मिळते का ते बघावे जेणेकरून मालमत्ता खरेदी व्यवहार करताना ती किती रकमेला खरेदी करावी याचा आपल्याला अंदाज येईल. कधी कधी असे होऊ शकते कि आपल्याला वाटते कि आपले कर्ज मंजूर होऊन जाईल परंतु काही तांत्रिक कारणाने ते नामंजुरही होऊ शकते त्या परिस्थिती आपल्या खरेदी व्यवहार पूर्ण करणे जिकिरीचे जाते.
वकिलाचा कायदेशीर सल्ला
कधीही आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करणार असाल तर त्या आधी त्या प्रॉपर्टीचा एखाद्या चांगल्या वकिलाकडून लीगल ओपिनियन घ्यावे जेणेकरून तुम्हाला कळेल कि ती मालमत्ता कायदेशीररीत्या खरेदी करण्यासारखी आहे का नाही किंवा त्यावर कुठेली कोर्ट केस किंवा बँकेचे कर्ज तर नाही, ती प्रॉपर्टी त्या मालकाकडे कशी आली. यासाठी आपल्याला वकिलाची थोडी फीस द्यावी लागेल परंतु हा सल्ला आपल्याला भविष्यातील खूप मोट्या अडचणीतून वाचवू शकतो.
थोडक्यात महत्वाचे :
व्यवसायिक मालमत्ता कर्ज हे कुठल्याही व्यवसायासाठी खूप मोठी संधी आहे, जी व्यवसाय वृद्धी, स्थिरता आणि उत्पन्न वाढवण्याचा आर्थिक पाया मजबूत करते. मालमत्तेची मालकी, व्यवसाय विस्तार, स्थावर गुंतवणूक आणि करांमधून सूट असा फायदा उद्योजक त्यांचे उपक्रम नवीन उंचीवर नेऊ शकतात. तथापि, संपूर्ण संशोधन करणे, वेगवेगळ्या कर्जाचे तुलनात्मक अभ्यास करणे आणि आर्थिक तज्ञांशी सल्लामसलत करणे महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा, व्यवसायिक मालमत्ता कर्ज हा केवळ आर्थिक व्यवहार नसून आपल्या व्यवसायाच्या भविष्यातील गुंतवणूक आहे.