कर्ज (Loans)

५ कोटींपर्यंत विनातारण कर्ज, नव्या व जुन्या उद्योगांसाठी (CGTMSE information in Marathi)

CGTMSE योजनेची थोडक्यात ओळख

कर्जासाठी तारण न देऊ शकणाऱ्या उद्योगांना सक्षम करणे हा या योजनेचे सर्वात प्रथम व महत्वाचे उद्दिष्ट आहे. cgtmse scheme, म्हणजेच मायक्रो आणि स्मॉल एंटरप्रायझेससाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट (Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises) हि योजना भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या (MSMEs) वाढ आणि विकासास हातभार लावण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पात्र कर्जदारांना या योजनेअंतर्गत कोणतेही मालमत्ता तारण देण्याची गरज नाही त्यामुळे ज्यांच्याकडे तारण देण्यासाठी मालमत्ता नाही त्यांना उद्योग वाढीसाठी  लक्षणीय प्रोत्साहन मिळते. एवढेच नव्हे तर आपल्याला कोणताही जामीनदार देण्याची सुद्धा आवश्यकता नाही. उद्योगांना लागणारे खेळते भांडवल, व्यवसाय वाढीसाठी किंवा आधुनिकीकरणासाठी आवश्यक असलेला निधी या योजनेअंतर्गत मिळू शकतो. हि योजना नवीन उद्योजक व लहान उदयोजकांना जीवनदायी ठरली आहे. या लेखामध्ये, आम्ही योजनेचे चे पात्रता निकष (Eligibility criteria), कर्ज कव्हरेज (cgtmse coverage), अर्ज प्रक्रिया (cgtmse coverage application process) आणि यामुळे MSME क्षेत्राला होणारे फायदे याची माहिती सांगणार आहोत. नवीन व छोट्या उद्योगांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या यशाच्या दिशेने प्रवासाला चालना देण्यासाठी आम्ही या योजनेची ची अफाट क्षमता आपल्यासमोर मांडत आहोत.

पात्रता निकष (cgtmse scheme eligibility)

विनातारण कर्ज (Loans Without Collateral) योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष (cgtmse scheme eligibility) आहेत आधी ते आपण समजावून घेऊ. जसे कि उद्योगामध्ये मशीनरी घेण्यासाठी किती गुंतवणूक करणार आहेत (Investment in Plant and Machinery) किंवा केलेली आहे, तसेच वार्षिक उलाढाल (Annual Turnover) किती झालेली आहे. आपण बँकेच्या इतर नियमानुसार कर्जाला पात्र आहात का तेही पाहिले जाते. या योजने अंतर्गत शेतीशी थेट निगडित असणारे व्यवसाय पात्र नाहीत. तसेच जेव्हा योजना सुरु झाली तेव्हा ट्रेडिंग व्यवसाय या योजनेसाठी पात्र नव्हते परंतु नवीन नियमानुसार ट्रेडिंग व्यवसाय सुद्धा योजनेसाठी पात्र आहेत.

गँरंटी कव्हर (Guarantee  cover)

CGTMSE योजना नवीन आणि छोट्या उद्योगांसाठी मैलाचा दगड ठरू शकते. या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी गँरंटी कव्हर मिळते जेणेकरून आपल्याला बँकेतून कर्ज घेण्यासाठी कोणतीही मालमत्ता तारण देण्याची आवश्यकता नाही. फक्त कर्जदारांनाच नाही तर या योजनेअंतर्गत बँकेचा पण फायदा आहे कारण कर्जदाराच्या कर्जाला कव्हर देत असल्याने बँक सुद्धा जोमाने कर्जपुरवठा करतील. एकदा का छोट्या उद्योगांची हि व्यवसायातील पैशाची गरज पूर्ण झाली तर त्यांना त्यांच्या विकासापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि त्यांच्या विकासासोबतच आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासपण होताच राहणार.

योजनेचे फायदे (Benefits of CGTMSE Scheme in Marathi)

सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला विनातारण कर्ज मिळते. बहुतेक वेळेस आपल्याला असे दिसून येते कि एखादा उद्योजक कर्तृत्ववान आहे परंतु त्याच्या कडे कर्ज घेण्यासाठी बँकेला तारण देण्यासाठी पुरेशी मालमत्ता नसते त्यावेळी हि योजना त्याच्यासाठी नक्कीच वरदान ठरेल.

  1. एखाद्या उद्योगाला या योजनेअंतर्गत वाढीव कर्ज घेऊन आपल्या उद्योगाचा विस्तार करता येउ शकतो किंवा आपल्या उद्योगाचे आधुनिकीकरण करता येऊ शकते.
  2. बँकांनासुद्धा या योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जामध्ये कमी रिस्क असते कारण या कर्जाची गॅरंटी CGTMSE ने घेतलेली असते. नवीन उद्योगांना कर्ज पुरवठा करताना सुद्धा बँकेला जास्त जोखीम पत्करावी लागत नाही.
  3. अश्या कव्हरेज असलेल्या कर्जाचे व्याजदर सवलतीचे असू शकतात तसेच यामध्ये परतफेडीचा कालावधी जास्त मिळू शकतो.
  4. समाजामध्ये उद्योजकतेचे प्रमाण वाढून सामाजिक व आर्थिक विकास साधला जातो.
  5. समाजातील आजपर्यंत न पोचलेल्या घटकांपर्यंत पोचून त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करू शकते आणि त्यांना मुख्य औद्योगिक प्रवाहात आणू शकते.
  6. उद्योग व्यवसायामध्ये नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान आणले जाऊ शकते जेणेकरून वाढत्या लोकसंखेच्या वाढत्या मार्केट च्या गरज उद्योग पूर्ण करू शकतील.
  7. उद्योगांमधील सर्व घटकांना कर्ज मिळण्याच्या सामान संधी मिळून व्यवसायामध्ये स्पर्धात्मकता निर्माण होते.
  8. वाढत्या उद्योगांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असतात.

अर्ज करण्याची पद्धत (Application Process of cgtmse scheme)

या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आपण कर्ज घेत असलेल्या बँकेमध्ये आपण कर्ज घेताना त्यांना लेखी कळवू शकता कि आपले कर्ज खाते या योजनेखाली कव्हर करावे. बँक स्वतः CGTMSE कडे ऑनलाइन अर्ज सादर करते.

cgtmse scheme मध्ये लागणारी फिस (cgtmse fee)

खाली दिलेल्या तक्त्या प्रमाणे ची फिस लागू राहील. हि फीस दि. ०१.०४.२०२३ पासून खालील दराने आहे. हि सर्व फिस कर्जदारला स्वतः भरावी लागेल. cgtmse fees हि वार्षिक असते.

स्लॅब (cgtmse loan limit)फी चा दर (टक्केवारी मध्ये) in %
० – १० लाख०.३७
१० लाख – ५० लाख०.५५
५० लाख – १ करोड०.६०
१ करोड – २ करोड१.२०
२ करोड – ५ करोड१.३५

cgtmse scheme चांगली कि मालमत्ता तारण दिलेली चांगली

सर्वात प्रथम महत्वाचे म्हणजे आपले कर्ज आपण व्यवस्थित परत फेड करत असाल किंवा करणार असाल तर आपल्याला या गोष्टीचा विचार करण्याची गरजच नाही. तरीही या योजनेचा उद्देश असा आहे कि ज्या व्यक्तीमध्ये कर्ज मिळवण्यासाठी सर्व पात्रता आहेत फक्त तारण देण्यासाठी कोणतीही मालमत्ता नाही त्यांच्यासाठी हि योजना सर्वोत्तम आहे.

ज्यांच्याकडे तारणदेण्यासाठी मालमत्ता आहे तर ते हि मालमत्ता बँकेकडे कर्जासाठी तारण देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला वार्षिक फीस देण्याची गरज नाही. तुम्हाला वाटेल कि मालमत्ता मॉर्टगेज करण्यासाठीही खर्च येतोच ना पण मित्रांनो हा खर्च एकदाच करायचा आहे आणि पण हि फीस वार्षिक असते. या सर्व रकमेचा हिशोब करून आपण ठरवू शकता. मी असे खूप कर्जदार बघितले आहेत कि जे बँकेला सांगतात आम्ही मालमत्ता तारण देतो आमची या योजनेखाली कव्हर करू नका आणि आणि आमची फीस घेऊ नका.

समजा काही कर्जदारांकडे कर्जासाठी तारण देण्यासाठी पुरेशी मालमत्ता नाही म्हणजेच ५० लाख कर्जाची आवश्यकता आहे आणि ३० लाखाची मालमत्ता आहे तर अशा प्रकरणात आपण ३० लाखाची मालमत्ता तारण ठेऊन उर्वरित २० लाख रकमेसाठी या योजनेचे कव्हर घेऊ शकता.

योजना कशी कार्य करते CGTMSE Process in Marathi

योजनेचे कव्हर असणारे कर्ज खाते थकीत गेल्यास सर्व प्रथम बँक आपल्यावर कायदेशीर कारवाई करते आणि त्यातून कर्ज वसुली नाही झाली तर आपली बँक ऑनलाइन माध्यमातून CGTMSE ला आपण कर्ज थकीत केल्याचे कळवते. त्यानंतर CGTMSE कव्हर असलेल्या रकमेपैकी ५०% रक्कम बँकेला पाठवते व बँक ती रक्कम आपल्या थकीत कर्ज खात्यात जमा करते. समजा त्यानंतर आपण काही कर्ज रक्कम भरली तर ती बँकेला CGTMSE ला देणे बंधनकारक असते. बँक तोपर्यंत CGTMSE ला रक्कम पाठवते जोपर्यंत ५०% रक्कम वसूल होत नाही. हि सर्व प्रक्रिया चालू असताना वसुलीची कायदेशीर प्रक्रिया चालू असते.

कोणकोणत्या बँकेमध्ये cgtmse scheme अंतर्गत कर्ज घेण्याची सुविधा असते?

सर्व बँकांमध्ये जसे की सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रायव्हेट बँका, ग्रामीण क्षेत्रीय बँका तसेच NBFC मध्ये सुद्धा CGTMSE ची सोय असते.

उद्यम नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक (Udyam Registration Certificate is Mandatory)

२५ ऑगस्ट २०२३ च्या परिपत्रकानुसार (Circular No. 229/2023-24) CGTMSE चा लाभ घेण्यासाठी आपला उद्योग “उद्यम रेजिस्ट्रेशन पोर्टल Udyam Registration Portal” वर नोंद असला पाहिजे, जर आपण नोंदणी केली नसेल तर खालील लिंक वरून मोफत उद्यम रेजिस्ट्रेशन पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी. हि नोंदणी आधार प्रामाणिकरणाद्वारे होत असते तसेच यासाठी कुठलीही फीस नाही.

थोडक्यात महत्वाचे

नवीन व छोट्या उद्योगांना कर्जपुरवठा करण्यासाठी अत्यंत उपयोगी योजना आहे कारण यात कर्जासाठी कोणतेही स्थावर मालमत्ता तारण द्यावे लागत नाही. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा त्यामध्ये आधुनिकीकरण आणण्यासाठी सुद्धा आपण या योजनेचा नक्की फायदा घेऊ शकता. कर्जदारांबरोबरच बँकांना पण हि योजना खूप फायदेशीर आहे कारण CGTMSE मध्ये कर्ज कव्हर केल्याने बँकेची खूप मोठी रिस्क कमी होऊ शकते.

Frequently Asked Questions

Rohit Mali

With a decade in blogging and working in a finance with leading financial institution, I am a experienced finance blogger dedicated to simplifying the complexities of loans, business, and finance. Specializing in content made for the people of Maharashtra, India, my articles aim to empower readers with valuable insights and practical knowledge, making the intricacies of the financial world accessible to all.

9 thoughts on “५ कोटींपर्यंत विनातारण कर्ज, नव्या व जुन्या उद्योगांसाठी (CGTMSE information in Marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *